अनेक दिवस चर्चेत असलेली शिवसेना(ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज (सोमवार) करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची दुपारी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यात नव्या युतीची घोषणा केली जाईल. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेसाठी ठाकरे हे ‘आंबेडकर भवना’त जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सूचक विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “आज दुपारी साडेबारावाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकारपरिषद आंबेडकर भवन, नायगाव, दादर (पूर्व) येथे होईल. महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या राजकारणातील हे एक क्रांतfकारी पाऊल आहे. आंबेडकर आणि ठाकरे ही दोन नेत्यांची किंवा दोन पक्षांची युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्ती जी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही मोठ्याप्रमाणात आहे. त्या दोन विचारांची ही युती आहे आणि हे बाळासाहेब ठाकरे यांचं खूप जूनं स्वप्न होतं.”

हेही वाचा – “स्मारकं होतील, पुतळे उभे राहतील, तैलचित्रांचे अनावरण होतील, राजकारण होईल पण…” बाळासाहेबांचे स्मरण करत संजय राऊतांचं विधान!

याचबरोबर, “आज महाराष्ट्रात खूप मोठी क्रांतिकारक घोषणा होईल, लोक त्याला राजकारण म्हणू शकतात. राजकारण आहे तर राजकारण आहे. आज प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकारपरिषद आहे आणि दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा होईल. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे खूप मोठं, क्रांतिकारी पाऊल आहे.” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

हेही पाहा : “ह्या मनगटास तूच शिकवली लढण्याची वहिवाट…” बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मनसेकडून राज ठाकरेंचा ‘तो’ भावनिक व्हिडीओ ट्वीट!

याशिवाय, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू एकत्र येणार आहेत. हा खूप मोठा संदेश आहे. पुढे महाराष्ट्रात आणखी खूप काही घडणार आहे.” असं सूचक विधानही यावेळी संजय राऊतांनी केलं.

रामदास आठवले यांना बरोबर घेत शिवसेनेने शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग यापूर्वीही केला होता. आठवले भाजपबरोबर गेल्याने शिवसेनेने आता प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्याचा महानगरपालिका निवडणुकीत फायदा करून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay rauts reaction on vanchit bahujan aghadi and shiv sena alliance msr