भाजपाशी काडीमोड करून अविभाजित शिवसेनेने राष्ट्रवादी (अविभाजित), काँग्रेसशी युती केली होती. त्यानंतर २०१९ साली महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते. भाजपाने ऐनवेळी दगा दिला. निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचं ठरलं होतं. मात्र निवडणूक झाल्यानंतर भाजपाने त्यास नकार दिला. त्यामुळेच आम्ही भाजपाशी असलेली युती तोडली, असा दावा शिवसेनेने केला होता. तर निवडणुकीपूर्वी असा कोणताही करार झाला नव्हता, असं भाजपाकडून सांगितलं जातं. यावरच आता शिवसेनेतील (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. भाजपा आणि शिवसेनेकडे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद असेल असं ठरलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनाच भाजपाशी युती करायची नव्हती असं शिरसाट यांनी सांगितलंय.

“अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलं होतं”

“उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेत अमित शाह खोटं बोलतायत असं सांगितलं. तसंच भाजपासोबत युतीत असताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते खरं आहे. त्यांनी तुळजाभवानीची जी शपथ घेतली तीदेखील खरी आहे. सुरुवातीची अडीच वर्षे भाजपा मुख्यमंत्रिपद घेणार होती. त्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे असणार होते,” असा मोठा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
amit shah slams uddhav thackeray in karad public meeting
बाळासाहेबांनी कमावलेले सर्व उद्धव ठाकरेंनी गमावले; अमित शहा यांचा हल्लाबोल
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही

“शेवटच्या क्षणाला भाजपाने…”

“उद्धव ठाकरे यांना युतीच करायची नव्हती. त्यांना भाजपाबरोबर जायचंच नव्हतं. याच कारणामुळे अगोदर आम्हाला मुख्यमंत्रिपद द्या अन्यथा आम्ही तुमच्यासोबत येणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. शेवटच्या क्षणाला भाजपाने तेही मान्य केलं. आम्ही अगोदर तुम्हाला मुख्यमंत्रिपद देतो, असं भाजपाने मान्यही केलं होतं. भाजपाने हा प्रस्ताव ठेवला होता की नाही हे उद्धव ठाकरेंनी शपथ घेऊन सांगावे,” असं आव्हानच संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.

“उद्धव ठाकरेंनी लालसेपोटी…”

“त्यावेळी ‘मला त्यांच्यासोबत जायचंच नाही. एकनाथ हवं तर तू बोल पण मी जाणार नाही,’ असा अट्टहास उद्धव ठाकरेंनी केला होता. शरद पवार यांनी पाच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची ऑफर दिली होती. पाच वर्षे मुख्यमंत्रिद तसेच अनेक मंत्रिपदं मिळतायत या लालसेपोटी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी घरोबा केला,” असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला.