लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत घेतली. यावेळी एनडीमधील पक्षाच्या जवळपास ७० खासदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यामध्ये शिवसेना शिंदे गटाला फक्त एक राज्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे शिंदे गटात काहीसी नाराजी असल्याची चर्चा आहे. अशातच दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर लागलेल्या एका बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

“शिवसैनिकांनो, वाघांनो संघटित व्हा. महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील करा. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा”, असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे. यावर आता ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर बोलताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्सासंदर्भात माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे.

Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena district chief Vishal Kadam joined shiv sena in presence of Eknath Shinde
परभणी लोकसभा मतदारसंघात लागोपाठ तीन जिल्हाप्रमुखांची शिवसेनेला सोडचिठ्ठी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
Uddhav Thackeray vs Eknath Shinde over Shiv Sena chief Balasaheb Thackerays memorial
ठाकरे विरुद्ध शिंदे पुन्हा लढाई! ठाकरेंना सूड उगवायचा आहे

हेही वाचा : “भाजपाने आमच्याबरोबर दुजाभाव केला”, शिंदे गटाची खदखद; मंत्रिपदांवरून एनडीएत वाद पेटला?

संजय शिरसाट काय म्हणाले?

“दोन्ही गटाच्या दिशा वेगवेगळ्या ठरलेल्या आहेत. एक गट एका दिशेला तर दुसरा गट दुसऱ्या दिशेला आहे. मात्र, त्या दिशा बदलून एका दिशेला आले तर निश्चितच स्वागत केलं जाईल. पण त्या विचारसरणीमध्ये आणि या विचारसरणीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. एकेकाळी शिवसेना प्रमुख हे आमचे दैवत आहेत, असं सर्वजण म्हणायचे. मात्र, आता काही लोक शरद पवार आणि राहुल गांधी यांना आमचं दैवत म्हणायला लागले आहेत, त्यामुळे आम्हाला त्रास होतो. पण त्यांनी (उद्धव ठाकरे यांनी) त्यांची स्टॅटर्जी बदलली तर भविष्यात एकत्र यायला हरकत नाही”, असं मोठं विधान शिवेसना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

“शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो. शिवसैनिकांसाठी मातोश्री आणि शिवसेनेचे दरवाजे कायम खुले असणार आहेत. मात्र, ज्यांनी पक्षफोडीचं एक मोठं कट कारस्थान रचलं आणि हे कारस्थान रचताना शिवसेनेला पर्यायाने महाराष्ट्राला एका खाईत लोटण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, अशा कपटी आणि कारस्थांनी लोकांना बरोबर घ्यायचं की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांच्यावरही टीका केली. अनिल पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना म्हटलं होतं की, ‘अजित पवार गटाने ८० जागा लढवायला पाजिहेत.’ दरम्यान, यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “८० काय? १०० जागा मागा. मात्र, पक्षाच्या बैठकीत मागा”, असा टोला त्यांनी लगावला.

Story img Loader