राज्यात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे. या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी चोख प्रत्युत्तरही दिलं आहे.

“जे सत्तेसाठी सरकारमध्ये गेले आहेत ते नाराज राहणार नाहीत असं होणार नाही, ते नाराज राहणारच. कारण त्यांना व्यक्तिगत कितीही दिलं तरी कमीच आहेत. १५ आमदार जे शिंदे गटात गेले आहेत ते येत्या काळात उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा प्रयत्न करतील. चर्चा सुरू आहे. फक्त उद्धव ठाकरे त्यांना घेतील की नाही हे पाहावं लागेल”, असं रोहित पवार म्हणाले.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण

रोहित पवारांच्या या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “रोहित पवारही उद्धव गटाचे प्रवक्ते झाले म्हणजे आश्चर्य आहे. संजय राऊत होते प्रवक्ते, आता हे कशाला होतायत? रोहितजी आपला पक्ष बरा, आपल्याला काय करायचं दुसऱ्या पक्षात काय चाललंय ते”, अशी सूचना वजा टीका त्यांनी केली.

हेही वाचा >> अजित पवारांसोबत दररोज भांडायलाच हवे काय? कौटुंबिक संबंध थोडेच संपणार आहेत – रोहित पवार

रोहित पवार काय म्हणाले होते?

“सत्तेत सहभागी असलेले शिंदे गटातील काही आमदार नाराज आहेत. शिंदे गटातील १० आणि इतर ५ असे मिळून १५ जण ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक आहेत. शिंदे गटामध्ये याबाबत कुजबूज सुरू आहे. येत्या काळात यासंदर्भातील काही घटना घडणार आहेत. तसंच, येत्या काळात शरद पवारांच्या विचारांचाच विजय होईल”, असंही रोहित पवार म्हणाले.

एकंदरीत राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सरकार धास्तावले आहे. लोकांच्या हिताचे प्रश्न घेऊन लढण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे यासाठी स्वहित बाजूला ठेवून संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हा हाच संदेश साहेबांनी दिला आहे. तोच सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण मराठवाडा दौऱ्यावर असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.