विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र ठाकरे गटाने याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. माजी मंत्री तथा ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी तर ‘हे गद्दार लोक माझ्या तैलचित्राचे अनावरण करत आहेत, असे बाळासाहेब म्हणत असतील,’ असे विधान केले. याच मुद्द्यावर बोलताना संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे. नातू आहे म्हणजे अक्कल आली, असा त्याचा अर्थ होत नाही. आदित्य ठाकरे यांना कोणी गल्लीमध्येही विचारणार नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाकरे गट-वंचितच्या युतीची घोषणा, पण ‘फॉर्म्यूला’ काय? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पुढची राजकीय वाटचाल…”

“हे पोरगं बाळासाहेबांच्या मांडीवरसुद्धा बसलेलं नाही. बाळासाहेब ठाकरे काय होते, हे याला माहिती नाही. नातू आहे म्हणजे अक्कल आली, असा अर्थ होत नाही. त्यांना थोडी तरी जनाची किंवा मनाची वाटायला हवी होती. माझ्या आजोबांचे तैलचित्र आज विधानभवनात लागत आहे, यावर त्यांनी विचार करायला हवा होता. राजकारण खड्ड्यात गेलं. ते तैलचित्र कोणी लावले हादेखील वेगळा मुद्दा आहे,” अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली

हेही वाचा >>> ठाकरे गट-वंचित युती लवकरच तुटणार? उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले “मला मनापासून…”

“माझ्या आजोबांचे चित्र आज विधानभवनात लागत आहे. माझ्या आजोबांचे नाव समृद्धी महामार्गाला लागत आहेत. माझ्या आजोबांच्या नावाने आज दवाखाना सुरू होतोय, असा विचार करून आदित्य ठाकरे यांना अभिमान वाटायला हवा. मात्र त्यांना तो कमीपणा वाटतोय. बाळासाहेब ठाकरे होते म्हणून लोक तुम्हाला आदित्य साहेब म्हणत आहेत. अशा लोकांना गल्लीमध्येही कोणी विचारणार नाही. साहेबांची पुण्याई आहे म्हणून तुमचे नाव आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे,” असेही संजय शिरसाट म्हणाले.

हेही वाचा >>> “प्रकाश आंबेडकर आणि भीमशक्तीचा काय संबंध?” ठाकरे गट-वंचित युतीनंतर नारायण राणे आक्रमक; म्हणाले “त्यांनी दलितांचे…”

“त्यांनी बोलताना भान बाळगले पाहिजे. आज बाळासाहेबांनी आम्हाला मोठे केले आहे. आदित्य ठाकरे यांना त्याची जाणीव नसेल. त्यांच्याच नावावर तुम्ही जगत आहात. तैलचित्रामुळे त्यांना वाईट वाटत आहे का? तसे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगावे. बाळासाहेब ठाकरे त्यांचे आजोबा नाहीत. ते आमचे शिवसेनाप्रमुख आहेत. म्हणूनच आम्ही त्यांच्यासाठी काहीही करू,” असे म्हणत शिरसाट यांनी आपला संताप व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat criticizes aditya thackeray for commenting on balasaheb thackeray painting prd