Sanjay Shirsat Meet Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे. परंतु, महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असणार याबाबत खलबतं सुरू आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याचं वृत्त आहे. तर, सर्वाधिक आमदार निवडून आल्याने भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब केलं आहे. यादरम्यान, राजकीय पक्षांच्या गाठीभेटी वाढल्या असून बैठक अन् चर्चांना जोर आला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

राज्यात नव्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपाकडून पुढे आलं आहे. तर, अजित पवारांनीही या नावाला अनुमोदन दिलं आहे. परंतु, महायुतीच्या विजयामागे एकनाथ शिंदेंचं मजबूत नेतृत्त्व कारणीभूत असल्याने एकनाथ शिंदेंनीही मुख्यमंत्री पदाची मागणी केल्याची चर्चा आहे. महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. यादरम्यान, संजय शिरसाटांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मात्र, ही भेट राजकीय भेट नसून मैत्रीपूर्ण भेट होती, असं संजय शिरसाट म्हणाले.

हेही वाचा >> D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले; म्हणाले, “एखादा पक्ष किंवा व्यक्ती…”

मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग करण्याची गरज नाही

n

संजय शिरसाट म्हणाले, “निवडून आल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो नव्हतो. दोन दिवसांपासून पक्षाच्या बैठकी चालू होत्या. आज निवांत वेळ होता, त्यामुळे भेट घेतली. प्रत्येक नेत्याला मी भेटणार आहे. यामुळे संबंध कायम राहतात. आजची भेट मैत्रीपूर्ण भेट होती. चहा प्यायलो. गप्पा मारल्या. कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची एवढी मजबूत पकड आहे की त्यांच्यासाठी लॉबिंग करण्याकरता आमच्यसारख्यांची गरज नाही.”

“कोणी आमदार जाऊन लॉबिंग करेल आणि सांगेल असं होत नाही. वरिष्ठ पातळीवर निर्णय होत असतात. त्यामुळे कोणी कोणाला भेटलं तर लॉबिंग असा अर्थ घेऊ नका, असंही ते पुढे म्हणाले.