गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु आहे. अशातच मंत्री अनिल पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय भुवया उंचवल्या आहेत. गल्लीतील कार्यकर्त्यांपासून दिल्लीतील नेत्यांपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे, असं अनिल पाटील यांनी म्हटलं. याला शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनिल पाटील काय म्हणाले?

“गल्लीतील कार्यकर्त्यांपासून दिल्लीतील नेत्यांपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी इच्छा आहे. पण, त्यासाठी १४५ आमदारांचा आकडा गाठण्याची गरज आहे. तो गाठल्यावर अजित पवार राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री होतील. आता शिंदे सरकारच्या पाठीमागे आम्ही आहोत,” असं अनिल पाटील यांनी म्हटलं.

“अनिल पाटील किंवा त्यांच्या अन्य प्रवक्त्यांच्या वक्तव्याने…”

अनिल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांना विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे. “अनिल पाटील किंवा त्यांच्या अन्य प्रवक्त्यांच्या वक्तव्याने अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. पण, त्यांच्या अडचणीत नक्की वाढ होईल,” असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे.

“२०२४ पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील”

“एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेले होते. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. एकनाथ शिंदे यांची खुर्ची धोक्यात आहे, मुख्यमंत्रीपद जाणार, असं कयास विरोधकांकडून लावण्यात येतात. कुठेतरी अजित पवार यांचा बॅनर लावण्यात येतो. पण, असे काहीही होणार नाही. २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील,” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.