Sanjay Shirsat : महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी जाहीर होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं होतं. तसेच हिवाळी अधिवेशन हे बिनाखात्याच्या मंत्र्यांविना पार पडल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच खाते वाटपासाठी एवढा वेळ का लागला? यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र, यानंतर अखेर आज (२१ डिसेंबर) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं.

यामध्ये गृहमंत्री पद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यात आलं आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलं आहे. दरम्यान, आज खातेवाटप झाल्यानंतर लगेचच महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच? सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे नेते, तथा मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, असा मोठा दावा केला आहे. संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर खातेवाटप जाहीर होत नाही तोच आता महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे.

Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण
how to make Kolhapuri style bhadang
Kolhapuri Bhadang: ऑफिसमध्ये संध्याकाळी भूक लागते? मग चटपटीत, ‘कोल्हापूरी भडंग’चा डब्बा ठेवा बॅगेत; वाचा झटपट होणारी सोपी रेसिपी
Sukesh Chandrasekhar Letter to Nirmala Sitharaman
ठग सुकेश चंद्रशेखरचं अर्थमंत्री सीतारामण यांना पत्र; ७,६४० कोटी रुपयांचा कर भरण्याची तयारी
Malad Mith Chowki flyover , traffic,
मुंबई : मालाड मीठ चौकी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा
Soyabean Purchase Objective Failed farmers in trouble
सोयाबीन खरेदीचा खेळखंडोबा; जाणून घ्या, खरेदीचे उद्दिष्ट का फसले, शेतकऱ्यांचे किती कोटी थकले ?

हेही वाचा : मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; कोणतं खातं कोणाकडे? वाचा संपूर्ण यादी!

संजय शिरसाट काय म्हणाले?

“गेल्या ४० वर्षांपासून मी शिवसेनेचं काम करतोय. आज मला कष्टाचं फळ मिळालं. अनेक लोकांचे मोर्चे काढले. अनेकांचे निवडणुकीसाठी अर्ज भरले. पण आज त्याच चौकात माझं स्वागत होतंय, हा सर्वात मोठा आनंद आहे. आज माझे सर्व कार्यकर्ते खूष आहेत. मंत्रिपदाची संधी मला लोकांची सेवा करण्यासाठी मिळाली आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार? याबाबत विचारलं असता छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार आहे. मात्र, यासंदर्भातील औपचारीक घोषणा बाकी आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाटांना कोणतं खातं मिळालं?

हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आज राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय हे खातं मिळालं आहे.

Story img Loader