शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत रविवारी ( २७ ऑगस्ट ) सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. आपल्या दाढीवाल्याने भाजपाची पावडर लावली. भाजपात प्रवेश केला की शुद्ध होतात, असं हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला होता. याला शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “टोमणे मारण्याची ही पद्धत आहे. टाईमपास कसा होईल, हाच सभेचा अर्थ होता. बाकी काही नाही. विचारांचं किंवा कामांचे मंथन सभेत नव्हते. ठाकरेंनी अडीच वर्षात काय केलं? हे सांगितलं नाही. दोन-तीन लोकांना टार्गेट करायचं, हाच सभेचा अर्थ आहे.”

हेही वाचा : “मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे”, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; शरद पवारांना थेट आव्हान?

‘सरकार आपल्या दारी आणि थापा मारते लय भारी’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याबद्दल विचारल्यावर संजय शिरसाट यांनी म्हटलं, “‘शासन आपल्या दारी’ सभेत पन्नास-पन्नास हजार लोक येतात. मग, सभेत थापा मारतात की लोकांची कामे होतात, हे त्यांना विचारा. सभेला येणारी लोक येडी आहेत का? गरीबाला मिळालेल्या मदतीची उद्धव ठाकरे चेस्टा करत आहेत.”

हेही वाचा : “…म्हणून अजित पवारांना शरद पवारांविरोधात बोलावं लागणार”, काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

हिंगोलीतील सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पक्ष फोडला आणि इतर पक्षातून नेते फोडतात, माझ्या वडिलांचा फोटो वापरणार आणि ताकद म्हणणार असं कसं चालेल? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. तुम्हाला घराणेशाही म्हणण्याचा हक्क नाही. तुम्ही माझा बाप चोरता तुम्हाला घराणेशाहीवर बोलायचा अधिकार नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat reply uddhav thackeray over eknath shinde bjp powder ssa
Show comments