मागील अनेक दिवसांपासून राज्यातील जनतेसह सत्ताधारी आणि विरोधकांचेही मंत्रीमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये वर्णी लागावी म्हणून शिंदे आणि भाजपा पक्षातील अनेक नेते आपली ताकद पणाला लावत आहेत. असे असताना सर्वांनाच मंत्रीपद देता येत नसल्यामुळे शिंदे गटातील नाराज नेत्यांना कसे संतुष्ट करावे, हा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढील मुख्य प्रश्न आहे. असे असतानाच शिंदे गटातील नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर महत्त्वाचे विधान केले आहे. येत्या २० -२२ जानेवारीदरम्यान मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो, असे शिरसाट म्हणाले आहेत. ते आज (७ जानेवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> ठाकरे गटातील सर्व आमदार शिंदे गटात येणार? संजय शिरसाटांचं मोठं विधान; म्हणाले, “आठ ते दहा दिवसांत..!”

“मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे. तसे झाले तर कामाचा वेग वाढेल. मी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मात्र त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारासाठीच्या काही तांत्रिक अडचणी सांगितल्या आहेत. त्या अडचणी येत्या १५ तारखेपर्यंत संपतील, असा माझा अंदाज आहे, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.

हेही वाचा >> औरंगजेबावरील विधानावरून नितेश राणेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका, ‘उंची किती, वजन किती’चा उल्लेख करत म्हणाले; “आमचा खरा आक्षेप…”

संजय शिरसाट यांनी राज्य सरकारला मंत्रीमंडळ विस्तार करणे गरजेचे आहे, असे सांगितले. “२०-२२ तारखेदरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. कारण अनेक मंत्रीपदं भरायची बाकी आहेत. फक्त काही गोष्टींमुळे थांबलंय. मंत्रीमंडळ विस्तार होणारच आहे. तो करावाच लागणार आहे, हे मी ठामपणे सांगतो. मंत्रीपदाची अपेक्षा सर्वांनाच आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.

हेही वाचा >> “…तर मग छत्रपती संभाजी महाराजांवरून टीका कशाला करता?” नितेश राणेंचा विरोधकांना परखड सवाल!

दरम्यान, शिवसेनात बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी संजय शिरसाट हेदेखील एक महत्त्वाचे नेते होते. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा संजय शिरसाट यांना होती. मात्र तसे झाले नाही. याच करणामुळे संजय शिरसाट नाराज असल्याचेही म्हटले जात होते. त्यानंतर आता दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat said maharashtra cabinet expansion will take place between 20 t0 22 january prd