खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत शुक्रवारी (२ जून) ऑन कॅमेरा थुंकले होते. त्यांच्या या कृतीचे राज्यभर पडसाद उमटले. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात संजय राऊतांनी किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे”, याबाबत संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं”. राऊत आणि पवार या दोघांमधली खडाजंगी थांबण्याचं नाव घेत नव्हती. अशातच पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना यावर प्रतिक्रिया विचारली. तर अजित पवार म्हणाले, संजय राऊत हे मोठे नेते आहेत. त्यांचं वक्तव्य मी मनाला लावून घेत नाही. इतरांनी तरी ते कशाला मनाला लावून घ्यावं.
“…म्हणून राऊतांची भाषा बदलली”, अजित पवारांवरील टीकेवरून संजय शिरसाटांचा टोला
खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर माघार घेतली होती. परंतु त्यानंतर आता संजय शिरसाटांनी राऊतांना टोला लगावला आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-06-2023 at 14:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat says ajit pawar gave answer to sanjay raut in his language asc