सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात रस्सीखेच चालू होती. या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं तिन्ही पक्षांचे नेते सातत्याने सांगत होते. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये १७ उमेदवारांची नावं असून यात सांगलीच्या जागेचाही समावेश आहे. ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. परंतु, या उमेदवारीला काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. त्यास पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेत्यांचा पाठिंबादेखील आहे. परंतु, ठाकरे गटाने या जागेवरून त्यांचा उमेदवार जाहीर केला असल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे.
“शरद पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे गटात भांडण लावलं”, शिवसेना आमदाराचं वक्तव्य; म्हणाले, “त्या खेळीत उबाठा गट फसला”
संजय शिरसाट म्हणाले, ज्या सांगलीत शिवसेना उबाठा पक्षाचं अस्तित्व नाही, जी जागा ते कधी लढले नाहीत त्या जागेवर उबाठा गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कसा काय निर्माण होईल.
Written by अक्षय चोरगे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-03-2024 at 20:46 IST
TOPICSउद्धव ठाकरेUddhav Thackerayभारतीय राष्ट्रीय काँग्रेसIndian National Congressलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionशिवसेनाShiv SenaसांगलीSangli
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat says sharad pawar made dispute between congress thackeray shivsena sangli lok sabha asc