Sanjay Shirsat Slam Sanjay Raut : दावोस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) सहभागी होण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे गेले आहेत. यादरम्यान कांग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सामंत यांच्याबद्दल काही खळबळजनक दावा केला आहे. वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी दावा केला आहे की भाजपा आता एकनाथ शिंदे यांना बाजूला करेल. तसेच शिवसेनेत आात नवा ‘उदय’ होईल. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

संजय राऊतांचा दावा फेटाळून लावत संजय शिरसाट म्हणाले की, “उदय सामंत यांच्यावर एकनाथ शिंदे जास्त जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जे चार-पाच जण महत्त्वाचे आहेत त्यांच्यावर ही वेगवेगळी जबाबदारी टाकली जाते. कोणीही आमदार, ६० पैकी एकही शिंदेंच्या आदेशाशिवाय काम करत नाही, हे मी स्पष्ट सांगतो”.

Rahul Shewale On Congress MLA
Rahul Shewale : “राज्यात २३ जानेवारीला राजकीय भूकंप होणार”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “१० ते १५ आमदार…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Ajit Pawar
Ajit Pawar : शिवसेनेत ‘उदय’ होणार? अजित पवारांची वडेट्टीवार आणि राऊतांच्या दाव्यांवर रोखठोक प्रतिक्रिया
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी विवाह ठरला; दोघांच्या कुटुंबियांनी दिली मान्यता
Akshay Shinde Encounter enquiry report Bombay High Cour
“महायुती सरकारची उच्च न्यायालयाकडून पोलखोल”, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरील सुनावणीनंतर काँग्रेसचा हल्लाबोल
Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?
Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!

“उदय सामंत आणि आम्ही सर्वजण एक आहोत. आमच्यात कोणतीही फूट नाही आणि कोणी टाकण्याचा प्रयत्नही करू नये”, असेही त्यांनी विरोधकांना बजावले.

पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “उठाव कसा करायचा हे आमच्याकडून शिका. आमदार कसे बरोबर घ्यायचे ते आमच्याकडून शिका, त्याचे आम्ही मास्टर, गुरु आहोत. तुम्हाला एका ठिकाणी बसून किंवा बडबड करून आमदार इकडचे तिकडं होत नसतात हे कळायला तुम्हाला आणखी फार वेळ लागणार आहे. म्हणून असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांची फक्त कीव येते”. उदय सामंत यांच्याकडं २० लोकांचा गट नाही तर ६० लोकांचा गट आहे, जेव्हा ६० लोकांचा गट असेल तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र आहोत. हे फक्त हेडलाईन बनवण्यासाठी, आमच्यात फूट आहे हे दाखवण्यासाठी हे सुरू आहे. आमच्यात कोणतेही वाद विवाद नाहीत हे मी जबाबदारीने बोलत आहे, असेही शिरसाट यांनी स्पट केले.

वडेट्टीवार काय म्हणाले?

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, “मी एक वक्तव्य करत आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना पुढे आणलं. त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांना संपवून उद्या एक नवीन उदय पुढे आणला जाईल. तो उदय कुठला असेल ते मी सांगत नाही. मात्र त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल”. यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी विजय वडेट्टीवार यांना विचारलं की, “तुम्हाला उदय सामंत यांचा उल्लेख करायचा आहे का?’ त्यावर, वडेट्टीवार म्हणाले, “उद्याचा शिवसेनेचा तिसरा उदय असेल. तुम्हाला नवा उदय दिसू शकतो आणि ही शक्यता नाकारता येत नाही. कारण काही उदय दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभे आहेत. त्यांनी दोन्ही बाजूंशी सुंदर संबंध निर्माण करून ठेवले आहेत आणि हे प्रयत्न उद्यासाठीच आहेत”.

संजय राऊत काय म्हणाले होते?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आणि मंत्री उदय सामंत दावोसला गेले आहेत. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंतांना दावोसला नेलंय. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्याबरोबर २० आमदार आहेत. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच हा उदय होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले”.

Story img Loader