‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं आहे. त्यानंतर शिंदे यांचा गट आक्रमक झाला आहे. आज ( २० फेब्रुवारी ) प्रतोद भरत गोगावले यांनी काही आमदारांसह जात शिवसेना विधिमंडळातील कार्यालयाचा ताबा घेतला. यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. चोरांच्या टोळीने आज कार्यालयावर दावा ठोकला आहे. पण, हे फार काळ चालणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. याला आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आठ दिवसांत संजय राऊतांना याचं उत्तर दिलं जाईल. कुत्र पिसाळलं तर त्याला चावतात का? पिसाळलेल्या कुत्र्याला कोणतं तरी औषध देऊ शांत करु,” अशी घणाघाती टीका संजय शिरसाटांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा : “…तर निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द होऊ शकतो”, ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत उल्हास बापटांचं मोठं विधान

“संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सायको माणसाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं उचित वाटत नाही. निवडणूक आयोगाने अधिकृत पक्षाची मान्यता आम्हाला दिली आहे. त्यामुळे संजय राऊताना अपात्र कसं करता येईल, यावर लवकरच निर्णय घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांबद्दल संजय राऊतांनी अपशब्द वापरले आहेत. त्यापार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे,” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.

हेही वाचा :  …तर खुद्द उद्धव ठाकरेंनाही शिंदे गटाचा व्हीप लागू होणार? निवडणूक आयोगाच्या निकालामुळे ठाकरे गटासमोर पेच!

“संजय राऊतांच्या भाषेला भाषेने उत्तर दिलं असतं. पण, ती आमची संस्कृती नसून, बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिकवण नाही. त्यामुळे हत्ती चले बाजार आणि कुत्ते भोके हजार, अशी संजय राऊतांची अवस्था आहे. चिखलावर दगड मारून ते आमच्या अंगावर उडवून घेण्याएवढं आम्ही मुर्ख नाही,” असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsath reply sanjay raut over eknath shinde comment ssa
Show comments