वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये करून नेहमी चर्चेत राहणारे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या नव्या वक्तव्यामुळे ते वादात अडकले आहेत. आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. बांगर विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, आमदार संतोष बांगर यांनी शाळेतल्या चिमुकल्यांना सांगितलं की, “तुमचे आई-वडील येत्या निवडणुकीत मला मतदान करत नसतील तर दोन दिवस जेवू नका.” तसेच बांगर यांनी चिमुकल्या मुलांकडून वदवून घेतलं की, ते त्यांच्या आई-वडिलांसमोर काय बोलणार? कोणाला मतदान करायला लावणार?

आमदार संतोष बांगर शाळेतल्या चिमुकल्यांना म्हणाले की, “तुमच्या आई-वडिलांना आमदार संतोष बांगरला मतदान करण्यास सांगा. नाहीतर तुम्ही दोन दिवस जेवू नका. तुम्ही जेवला नाहीत आणि आई-वडिलांनी विचारलं की तू जेवत का नाहीस? तर त्यांना सांगा की तुम्ही आमदार संतोष बांगर यांना मतदान करा, मी त्यानंतर जेवेन.” त्यानंतर संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना विचारलं की, तुम्ही तुमच्या आई-वडिलांना काय सांगणार? कोणाला मतदान करायला सांगणार? या प्रश्नांची विद्यार्थ्यांकडून घोकमपट्टी करून घेतली. संतोष बांगर चिमुकल्यांना हा अजब सल्ला देत असताना शाळेतील कर्मचारी, शिक्षिका आणि बांगर यांचे कार्यकर्ते हसत होते.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?

“…तर भर चौकात फाशी घेईन”

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर विविध कारणांमुळे नेहमी प्रसिद्धीझोतात असतात. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भर चौकात फाशी घेईन, असं वक्तव्य बांगर यांनी केलं होतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिल्यानंतर संतोष बांगर म्हणाले, “अपात्रता आणि शिवसेनेचा निकाल आमच्या बाजूनं लागणार, हे आम्ही छातीठोकपणे सांगितलं होतं. पुन्हा एकदा मी छातीठोकपणे सांगतो की, एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भर चौकात फाशी घेईन. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत.”

Story img Loader