ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोलीत जाहीरसभा घेतली. या सभेतून ठाकरे यांनी भाजपासह शिंदे गटाचे स्थानिक नेते संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं. गद्दाराची नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं. पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं वाया गेलं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला संतोष बांगर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे यांनी येड्यांची जत्रा उभी केली. येडे काहीही करू शकत नाहीत. थोडं त्यांच्यावर अंगावर धावून गेलं की, ते भुर्र पळून जाणारी लोक आहेत. याचा आमच्या शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही, अशी टीका संतोष बांगर यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “टरबुजालाही पाणी लागतं”; उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले, “सर्वस्व गेलेल्या…”

यावेळी संतोष बांगर म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी जे चांडाळ चौकडी लोक जमा केले आहेत. ते एकनिष्ठ असल्याचं म्हटलं जातंय. पण त्यांच्या एका जिल्हाप्रमुखाने चार पक्ष बदललेत. तर दुसरा एक जिल्हाप्रमुख आधी राष्ट्रवादीचा होता. नंतर मनसे आणि आता शिवसेनेत आला आहे. हे लोक बजबजलेल्या नालीत बुडलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी येड्यांची जत्रा उभी केली. हे येडे काय करू शकतात, हे आपल्याला माहीत आहे. त्यांच्या अंगावर जरा धावून गेलं, तर हे भुर्र पळून जाणारी लोक आहेत. त्यामुळे याचा आमच्या शिवसेनेवर काही फरक पडणार नाही.”

हेही वाचा- भुजबळांनी शरद पवारांवर टीका करताच कार्यकर्त्यांची आरडाओरड? जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ज्यांचं खाल्लं, प्यायलं…”

बाप चोरल्याबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावर भाष्य करताना संतोष बांगर म्हणाले, “मला आतातरी असं वाटतंय की, उद्धव ठाकरे यांनी माझा बाप चोरला आहे, असं बोलणं बंद करावं. हे बस्स झालं आता. उद्या कुणीतरी म्हणेल माझा देव चोरला. मग देव कुणा एकाचा असतो का? तसेच बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यामुळे ते माझा बाप आहेत, असं कुणीही म्हणू नये. बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप होते. ते एका कुणाचे बाप असू शकत नाहीत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh bangar reaction on uddhav thackeray rally in hingoli rmm