शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत आमदार संतोष बांगर यांचा खरपूस समाचार घेतला. गद्दाराची नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून डसायला लागला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर केली होती. याला बांगर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“नाग हे शंकराच्या गळ्यातील वाहन आहे. संतोष बांगर नागनाथाचा भक्त असल्याचं उद्धव ठाकरेंना माहिती आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी मला नागाची उपमा दिली असावी,” असं संतोष बांगर यांनी म्हटलं.

“मला उद्धव ठाकरे म्हणायचे…”

‘मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी म्हणायचं का?’ असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला होता. याबद्दल प्रश्न विचारल्यावर संतोष बांगर म्हणाले, “१२ वर्षापासून मी हिंगोलीचा जिल्हाप्रमुख आहे. मला उद्धव ठाकरे म्हणायचे, ‘असाच बाळासाहेबांचा गुंड लागतो.’ तेव्हा उद्धव ठाकरेंना समजलं नाही का? मी मटका चालवतो की गुटका चालवतो? त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘हिंदुत्वाचा शेर, हिंदुत्वाचा गुंडा, संतोष बांगरसारखा असावा,’ असं म्हटलं आहे.”

हेही वाचा : “गद्दाराला नाग समजून पूजा केली, पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल

“उद्धव ठाकरेंनी माझा गौरव केला”

“उद्धव ठाकरेंवर बोलण्याएवढा मी मोठा नाही. पण, उद्धव ठाकरेंनी माझा गौरव केला आहे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझा उल्लेख केल्याने उर भरून आलं आहे. मला उद्धव ठाकरेंचे धन्यवाद मानायचे आहेत,” असं संतोष बांगरांनी सांगितलं.

हेही वाचा : VIDEO: मोदी अफ्रिकेला इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून गेले होते का? उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले…

“ठाकरे गटाने खंडणी वसूल सभा घेतली”

“ठाकरेंच्या शिवसेनेत येड्यांची यत्रा जमा केली आहे. ठाकरे गटाने खंडणी वसूल करून ही सभा घेतली आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडून किती पैसे घेतले, हे विचारा. ही येड्यांची जत्रा आहे. शिवसेना म्हणण्याच्या लायकीचे नाहीत,” अशी टीका संतोष बांगरांनी ठाकरे गटावर केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh bangar reply uddhav thackeray over snake and matka critics ssa
Show comments