शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण हे पक्षाचे निवडणूक चिन्ह नेमके कोणाचे या मुद्द्यावरून शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे. याबाबत सध्या निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी दोन्ही गटांच्या दाव्यावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. असे असतानाच निवडणूक आयोगाने याबाबतच्या सुनावणीला ३० जानेवारीची तारीख दिली आहे. २३ जानेवारी रोजी शिवसेनाच्या पक्षाध्यक्षाची मुदत संपत आहे. त्यामुळे या पदावर आता एकनाथ शिंदे बसणार की उद्धव ठाकरे कायम राहणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यावरच आता शिंदे गटातील नेते संतोष बांगर यांनी भाष्य केले आहे. आम्हाला एकनाथ शिंदे हेच शिवसेनच्या पक्षप्रमुख पदावर पाहायला आवडतील, असे बांगर म्हणाले आहेत. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
संतोष बांगर काय म्हणाले?
“शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची निवड केली जाणार आहे. या निवडीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे यांना पाहायला आवडेल,” असे संतोष बांगर म्हणाले आहेत.
हेही वाचा >> Video : राज ठाकरेंकडे जैन मुनींनी व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा; बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत म्हणाले, “त्यांचं…!”
नेमका पेच काय आहे?
शिवसेना पक्ष तसेच धनुष्याबाण या निवडणूक चिन्हावर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोघांनीही मालकी सांगितली आहे. याबाबत दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगासमोर आपला युक्तीवाद मांडला आहे. याबाबतचा युक्तीवाद पूर्ण झाला असून आयोगाने थेट निकाल न देता ३० जानेवारी ही पुढील तारीख दिली आहे. मात्र येत्या २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुखपदाचा कार्यकाल संपणार आहे. याच कारणामुळे ठाकरेंचा कार्यकाल संपल्यानंतर शिवसेनेच्या पक्षप्रमुख या पदावर कोण बसणार असे विचारले जात आहे. निवडणूक आयोगाने निकाल दिला असता तर हा पेचच निर्माण झाला नसता. मात्र आयोगाने ३० जानेवारी ही सुनावणीची तारीख दिल्यामुळे कायदेशीदृष्ट्या या पदावर कोण राहणार? याबाबत प्रत्येकजण आपापेल तर्क लढवत आहे.
हेही वाचा >> मुंबईत करोना काळात मोठा घोटाळा? संदीप देशपांडेंच्या दाव्याने खळबळ, २३ जानेवारीला देणार पुरावे!
शिवसेना पक्षप्रमुखाची निवड कशी केली जाते?
शिवसेनेच्या पक्षघटनेमध्ये पक्षप्रमुखांची नियुक्ती नेमकी कोण करणार? याविषयी निश्चित अशी नियमावली नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार, शिवसेनाप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील. त्यांची निवड ही पक्षाच्या प्रतिनिधी सभेकडून केली जाईल. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील निवडक सदस्य प्रतिनिधी सभेवर असतात. पक्ष प्रमुखांची निवड पाच वर्षांसाठी केली जाते.