Krishna Andhale Declared Wanted : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या हत्या प्रकरणाती सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याला बीड पोलिसांनी बुधवारी फरार घोषित केले आहे.

बीड पोलिसांनी आंधळेचा महाराष्ट्रासह शेजारील राज्यात देखील शोध सुरू केला आहे . इतकेच नाही तर पोलिसांकडून आंधळे याला अटक करण्यासाठी आवश्यक अशी माहिती देणाऱ्यास बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांकडून नागरिकांना कृष्णा आंधळे याच्याबद्दल माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
supriya sule News
Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचे सरकारला नऊ प्रश्न; म्हणाल्या, “वाल्मिक कराड…”
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन
Cold Play online ticket sales black market mumbai High Court PIL
कोल्ड प्ले ऑनलाईन तिकीट विक्री काळाबाजार प्रकरण : मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Maharashtra Sadan not available for Sahitya Sammelan Delay for four months on fee issue Nagpur news
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मिळेना! शुल्काच्या मुद्द्यावर चार महिन्यांपासून खल
Loksatta anvyarth Regarding the implementation of the Right to Information Act Supreme Court
अन्वयार्थ: कुंपणानेच खाल्ले शेत…

आरोपींची माहिती देणाऱ्यांना पोलिसांकडून बक्षीस दिले जाणार आहे. याबरोबरच अशी महत्त्वाची माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल असेही पोलिसांनी सांगितले आहे.

नेमकं काय झालं होतं?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते, त्यानंतर त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पवनचक्की कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीच्या प्रकरणात ही हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात वाल्मिक कराज याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या दिवसापासून आंधळे हा फरार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने दावा केला आहे की त्यांना कराडचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) सापडले आहेत. यावरून संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराड फोनवरून खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या संपर्कात होता. या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. वाल्मिक कराड याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाल्मिक कराडला याला गेल्या आठवड्यात बुधवारी बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Story img Loader