Santosh Deshmukh Murder Case Beed : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी (९ डिसेंबर) अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय, निकटवर्तीय व मित्र परिवाराने त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाहीत. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींवर देखील कारवाई करण्याचं काम चालू असून त्यांना देखील लवकरच अटक केली जाईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे. तसेच गावकऱ्यांनी एका पीएसआयवर काही आरोप केले होते. त्यानंतर त्या पीएसआयचं लगेच निलंबन करण्यात आलं.

दरम्यान, “माझ्या पोटचा गोळा गेला आहे, आम्हाला सरकारने न्याय द्यावा”, अशा शब्दांत मयत संतोष देशमुख यांच्या आईने टाहो फोडला. तसेच “माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी”, अशी मागणी देशमुख यांच्या पत्नी अश्विनी यांनी केली आहे. टीव्ही ९ मराठीने मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी देशमुख कुटुंबाने सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.

Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणी ग्रामस्थांचा सरकारला अल्टिमेटम; म्हणाले, “उद्या सकाळी १० वाजेपर्यंत…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Ashwini Deshmukh
Santosh Deshmukh : “संतोष देशमुखांना भीती वाटत होती, गुंड प्रवृत्तीचे लोक…”, हत्येच्या दोन दिवस आधी काय घडलं? पत्नीने सांगितला घटनाक्रम!
Dhananjay Deshmukh News
Dhananjay Deshmukh : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिलाय..”, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले?
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Santosh Deshmukh : “संतोष देशमुखांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी पकडले जात नसतील तर..”, वैभवी देशमुखची आर्त हाक
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत?” संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल

हे ही वाचा >> कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; सीएसएमटी परिसरात बसखाली आल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू

संतोष देशमुख यांच्या पत्नीचा टाहो

अश्विनी देशमुख म्हणाल्या, “माझे पती लातूरला होते. ते काही कामानिमित्त लातूरला थांबणार होते, मात्र नंतर त्यांनी गावी जायचं ठरवलं. त्यांना नेहमीप्रमाणे काही फोन आले होते. काही कामानिमित्त गावाकडे जावं लागणार होतं आणि ते गावाकडे निघाले. दुपारी १२ वाजता ते निघाले. मी दुपारी १.३० च्या सुमारास त्यांना फोन केला, त्यांना विचारलं की तुम्ही गावी पोहोचलात का? त्यावर ते म्हणाले, नाही, मी आत्ता चंदनसावरगावला पोहोचलो आहे. गावी पोहोचायला थोडा वेळ लागेल. त्यानंतर माझं त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नाही. माझे पती गेल्या १५ वर्षांपासून या गावचे सरपंच आहेत. १५ वर्षांपासून गावकऱ्यांसाठी काम करत आहेत. आमच्यासाठी, गावकऱ्यांसाठी ते देवासारखे होते. जनतेसाठी दिवस रात्र धावपळ करत असायचे. बऱ्याचदा जनतेची काम करताना ते घरच्यांना विसरून जायचे. कधी माझी मुलं आजारी पडली तर त्यांना रुग्णालयात त्यांनी नेलं नाही. मला म्हणायचे, तू त्यांना घेऊन जा. माझ्यावर दवाखान्यात जायची वेळ आली तर म्हणायचे, घरातल्या कोणाबरोबर तरी जा. कारण ते जनतेच्या कामात गुंतलेले असायचे. जनतेसाठी सदैव तत्पर असायचे. त्या देव माणसाची हत्या केली आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे किंवा माझ्या पत्नीबरोबर जे झालं तेच त्या मारेकऱ्यांबरोबर व्हायला हवं”.

हे ही वाचा >> Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!

संतोष देशमुख यांच्या आई म्हणाल्या, “माझ्या लेकराने सदैव लोकांची मदत केली. गोरगरिबांची मदत केली, म्हणून माझ्यावर ही वेळ आली आहे का? अशी वेळ कोणावरही येऊ नये. अशा लोकांना संरक्षण मिळायला पाहिजे. माझ्या लेकाची हत्या का झाली? कोणी केली? हे मला समजलं पाहिजे”.

Story img Loader