Karuna Sharma: संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार, असे सुतोवाच करुणा शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा सुपूर्द केल्यानंतर राजकारणात प्रतिक्रिया उमटत आहेत. आज राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार याबद्दल मी २ तारखेला रात्रीच पोस्ट टाकली होती. माझेही सूत्र आहेत. त्यांच्याकडून मला माहिती मिळाली होती. या विषयावर मी उपोषणाला बसणार होते. पण मला माहिती मिळाली की, मुंडेंचा १०० टक्के राजीनामा होणार आहे. त्यांनी राजीनामा लिहून दिलेला आहे. पण लोकांच्या समोर तो आज आला.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजीनामा नाही तर ही हकालपट्टीच

“धनंजय मुंडे मोठे नेते आहेत. त्यांना पाठीशी घालण्याचे काम मागच्या तीन महिन्यांपासून सुरू होते. आताही त्यांना लोक किती आक्रमक आहेत, हे पाहायचे होते. कालही माध्यमांशी बोलत असताना बोलले होते की, हा मुद्दा कुठपर्यंत जाईल. हे सरकारला पाहायचे होते. धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर नाही तर त्यांची हकालपट्टी झालेली आहे”, असेही करुणा शर्मा यावेळी म्हणाल्या.

संतोष देशमुखांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर समाजात असंतोष

३ मार्च रोजी संतोष देशमुख यांचे हत्या करतानाचे क्रूर फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले. आरोपी अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करत असल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. यानंतर समाज माध्यमांवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देऊन त्यांच्या पाठीराख्यांनाही जबाबदार धरले जावे, अशी मागणी मूळ धरू लागली होती. आज अधिवेशनात या मुद्द्यावरून रणकंदन होईल, अशी शक्यता होती. मात्र त्याआधीच सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती एक्स पोस्टवर दिली.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की “बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सद विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री महोदयांकडे मी राजीनामा दिला आहे.