Santosh Deshmukh Case बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधीमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात उमटल्याचं पाहण्यास मिळालं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला, आरोपी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचा असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना उत्तर दिलं.

अंबादास दानवे काय म्हणाले?

बीडमध्ये जे झालं ते गंभीर आहे. त्या प्रकरणात वॉचमनने अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. पोलीस सहकार्य करण्याऐवजी आरोपींना मदत करत आहेत. आरोपी बाहेर फिरत आहेत. ज्या आरोपीने खून केला त्याचे पोस्टर लावले जातात. बाप तो बाप है म्हटलं जातंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक तालुका अध्यक्ष यात आहे. तीन गुन्हेगार राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. एक मंत्री आहेत त्यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिक अण्णा नावाची ती व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने या प्रकरणात फोन केले आहेत. असा आरोप दानवे यांनी केला. ज्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिलं.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
wardha after DNA test and medical evidence real culprit cought and reveal teacher wast father of child
प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; दोन आरोपींना अटक, एका पीएसआयचं निलंबन
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
mp akhilesh yadav allegations on up government for sambhal violence
संभल हिंसाचार सुनियोजित कट! अखिलेश यांचा आरोप; पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

एका तरुण सरपंचाचा खून ( Santosh Deshmukh Case ) करण्यात आला आहे. हे गांभीर्याने घेतलं आहे. याप्रकरणात पीएसआय सस्पेंड आहे. पिआया सक्तीच्या रजेवर पाठवला आहे. आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे त्याला अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. ते तपास करत आहेत. आरोपी मंत्र्यांचा जवळचा आहे वगैरे असं बोलणं योग्य नाही. कारण संबंध नसताना मंत्र्यांवर अंगुलीनिर्देश होत असतो. AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आरोपी कुठल्या धर्माचा आहे जातीचा आहे हे न पाहता कारवाई होणार

आरोपी ( Santosh Deshmukh Case ) कुठल्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा आहे हे न पाहता कारवाई केली जाईल. ही केस सीआयडीला ट्रान्सफर केली आहे. SIT मार्फत चौकशी करुन, यामागे जो कोणी असेल त्यांना शोधून काढून कारवाई करु, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

नेमकी ही घटना काय घडली?

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्या ( Santosh Deshmukh Case ) करण्यात आली. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे ९ डिसेंबरला भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. संतोष पंडीतराव देशमुख हे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे दोघे दिनांक ९ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडीने मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी शिवराज देशमुख हे गाडी चालवीत होते. ते केज येथून मस्साजोगकडे जात असतांना डोणगाव फाट्याच्या जवळ असलेल्या टोलनाक्या जवळ एका काळ्या रंगाची स्कार्पिओ आडवी लावली. त्या गाडीतून सहा लोक खाली उतरले. त्यातील एकाने दरवाजाची काच दगडाने फोडून गाडीत पाहिले आणि दुसऱ्याने डाव्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या गाडीचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh Case ) यांना काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये त्यांना बळजबरीने बसवून केजच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले.अपहरण केल्यानंतर अपहरण झल्याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने दोन पोलीस पथके तपासाठी रवाना करण्यात आली होती. पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूर घाट रस्त्यावर दैठणा फाटा येथे मिळून आला होता.

Story img Loader