Santosh Deshmukh Murder Case Bajrang Sonwane : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी (९ डिसेंबर) दुपारी अपहरण केल्यानंतर सायंकाळी त्यांचा मृतदेह पोलिसांच्या पथकाला आढळून आला. यानंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केज पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालय परिसरात धाव घेतली. संतोष देशमुख यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती असून, मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. आरोपींना लवकरात लवकर पकडावं, या प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करावा अशा मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आंदोलन देखील केलं. गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत बुधवारी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील केली. ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या हत्या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी देखील कंबर कसून तपासाला सुरुवात केली. बुधवारी दुपारी पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

बीडचे पोलीस अधीक्षक देखील मंगळवारी मस्साजोगमध्ये दाखल झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी नागरिकांची समजूत घालत सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. त्यानंतर गावकऱ्यांनी केलेल्या मागण्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी मान्य केल्या. जवळपास आठ ते नऊ तास सुरु असलेलं आंदोलन गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर मागे घेतलं. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Santosh Deshmukh muder case
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका, वाल्मिक कराडचे काय?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Dhananjay Deshmukh News
Dhananjay Deshmukh : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिलाय..”, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले?
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
Santosh Deshmukh murder case
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपी भिवंडीत आले? भिवंडीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी नेमकं काय सांगितलं?
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Santosh Deshmukh : “संतोष देशमुखांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी पकडले जात नसतील तर..”, वैभवी देशमुखची आर्त हाक
CM Devendra Fadnvais on Santosh deshmukh murder case Update
Devendra Fadnavis: ‘संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा गुजरातमध्ये आश्रय’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत?” संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल

हे ही वाचा >> “…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”

पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई

“मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींवर देखील कारवाई करण्याचं काम चालू असून त्यांना देखील लवकरच अटक केली जाईल”, असं आश्वासन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिलं. त्याचबरोबर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी एका पीएसआयवर काही आरोप केले होते. त्यानंतर त्या पीएसआयचं लगेच निलंबन करण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> Ambadas Danve : विरोधी पक्षनेतेपदावरून ‘मविआ’त रस्सीखेच? अंबादास दानवेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य तो निर्णय…”

“हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी”, खासदार सोनावणेंची थेट केंद्र सरकारकडे मागणी

दरम्यान, हे प्रकरण आता केवळ राज्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी याप्रकरणी केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. बजरंग सोनावणे यांनी काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी अमित शाह यांच्यापुढे बीडमधील कायदा व सुव्यवस्थेसह लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. सोनावणे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “बीड जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणांच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली”.

Story img Loader