Santosh Deshmukh Murder Case Bajrang Sonwane : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी (९ डिसेंबर) दुपारी अपहरण केल्यानंतर सायंकाळी त्यांचा मृतदेह पोलिसांच्या पथकाला आढळून आला. यानंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केज पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालय परिसरात धाव घेतली. संतोष देशमुख यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती असून, मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. आरोपींना लवकरात लवकर पकडावं, या प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करावा अशा मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आंदोलन देखील केलं. गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत बुधवारी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील केली. ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या हत्या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी देखील कंबर कसून तपासाला सुरुवात केली. बुधवारी दुपारी पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा