रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी लिहिलेल्या ‘सापडलेलं आकाश’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकामध्ये प्रतिभासंपन्न व्यक्तींची शब्दचित्रे पाटणे यांनी रेखाटली आहेत. त्यांची श्रद्धापूर्वक आणि मूल्यसंस्कारित जीवन जगण्याची भूमिका या शब्दचित्रातून दिसून येते, असे गौरवोद्गार काढून कर्णिक म्हणाले की, अन्य कोणत्याही साहित्य प्रकारापेक्षा हाडामांसाची माणसे रेखाटणे जास्त कठीण असते. ते काम या पुस्तकात यशस्वीपणे झाले आहे. पुस्तकात रेखाटलेल्या व्यक्तींची समाजाशी असलेली नाळ पाटणे यांनी आपल्या मनोगतात कथन केली. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर व विजय कुवळेकर यांचीही या प्रसंगी भाषणे झाली. मत्र प्रकाशन संस्थेचे अनिल दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा.वालावलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अॅड. विलास पाटणे यांच्या ‘सापडलेलं आकाश’ पुस्तकाचे प्रकाशन
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी लिहिलेल्या ‘सापडलेलं आकाश’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकामध्ये प्रतिभासंपन्न व्यक्तींची शब्दचित्रे पाटणे यांनी रेखाटली आहेत. त्यांची श्रद्धापूर्वक आणि मूल्यसंस्कारित जीवन
आणखी वाचा
First published on: 18-04-2013 at 04:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sapadlele aakash book published