Sarangi Mahajan : दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंडे बहीण भावाने संगनमताने धाक दाखवून आणि कारस्थान रचून माझी कोट्यवधी रुपये किंमतीची जमीन हडपली असा आरोप सारंगी महाजन ( Sarangi Mahajan ) यांनी केला आहे.

काय म्हणाल्या सारंगी महाजन?

प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर २४० मधील करोडो रुपये किमतीची ३६.५० आर जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जबरदस्तीने घेतली असल्याचं सारंगी महाजन ( Sarangi Mahajan ) यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. सारंगी महाजन यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय उत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Uddhav Thackeray Launch Vachanan Nama
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा जाहीर, छत्रपती शिवरायांचं मंदिर, मोफत शिक्षण आणि काय काय वचनं?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

मला परळीच्या अनुसूया हॉटेलमध्ये बोलवून घेतलं गेलं आणि..

परळीत माझी ६३.५० आर जमीन होती, ३६ आर. जमीन फ्रॉड करुन विकली. मला परळीच्या अनुसूया हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसला नेले. तिकडे माझ्याकडून सही करुन घेण्यात आली. कोणी जमीन घेतली, हे आम्हाला माहिती नाही. तिकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेने घरी नेले, जेवू घातले. त्यानंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या. त्याला मी विरोध केला असता त्याने म्हटले की, सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी सोडून देणार नाहीत, अशी धमकी दिल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितले. गोविंद बालाजी मुंडे याने आम्हाला ठाण्यातील घरी आणून सोडले. त्यानंतर आमच्याकडून त्याने एक लाख रुपये घेतले, असेही सारंगी महाजन ( Sarangi Mahajan ) यांनी सांगितले

निवडणुकीच्या तोंडावर झाले आरोप

धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मराठवाड्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे परळी विधानसभेची लढाई अटीतटीची होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तोंडावर सारंगी महाजन ( Sarangi Mahajan ) यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. आता यावर धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे पण वाचा- Dhananjay Munde : “माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना…”; धनंजय मुंडेंच्या विधानाचा रोख कुणाकडे?

पंकजा आणि धनंजय मुंडेंनी दहशत पसरवली आहे

मी एवढंच सांगते आहे की मी न्यायालयाच्या चकरा मारते आहे. मी पोलीस स्टेशनला गेले होते. तक्रार केली होती. पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. आता मी पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे त्यांनी जर कारवाई केली नाही तर मी न्यायालयात दावा करणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघं बहीण भाऊ आणि त्यांचे चमचे यांनी मला त्रास दिला आणि मला किंवा माझ्या मुलांना काही झालं तर हे दोघंच जबाबदार असतील. पूर्णपणे दहशत या दोघांनीही माजवली आहे. मी दोन वर्षे फॉलोअप घेतला आहे. त्यातून मला या सगळ्या गोष्टी समजवल्या आहेत. आता मी कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे असंही सारंगी महाजन म्हणाल्या आहेत. मी राजकीय हेतूने वगैरे काहीही आरोप केलेले नाहीत. मी राजकारणात नाही, आत्ताही माझा राजकारण करत नाही असंही सारंगी महाजन ( Sarangi Mahajan ) म्हणाल्या आहेत. पंकजा आणि धनंजय हे दोघं बहीण भाऊ यांना सगळं आयतं मिळालं आहे. गोपीनाथ मुंडेंचं राजकारण यांच्यापेक्षा कैक पटीने चांगली होतं असंही सारंगी महाजन म्हणाल्या.