सरदार पटेल जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. ३१) शहरात एकता दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे एकता दौड व पोलीस पथसंचलन करण्यात येईल. अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एल. गिरी यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची बठक या बाबत झाली.
शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता जुना जालना भागातील टाऊन हॉलपासून एकता दौड निघेल. तिचा समारोप छत्रपती संभाजी उद्यानाजवळ होईल. या वेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथ देण्यात येईल. एकता दौडमध्ये शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्याíथनी, तसेच राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी सहभागी होतील. सायंकाळी साडेचार वाजता सरदार पटेल यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यापर्यंत पोलीस पथसंचलन होईल. यात पोलीस दल, राज्य राखीव दल, वन अधिकारी-कर्मचारी, सनिकी शाळेतील विद्यार्थी यांचा यात सहभाग असेल.
सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांनी स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहन बठकीत करण्यात आले. एकता दौड व पोलीस पथसंचलनाच्या वेळी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, लोकप्रतिनिधी, सामाजिक व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बाबतचे नियोजन, विचार-विनिमयासाठी आयोजित बठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राजेश ईतवारे, जि. प. अतिरिक्त सीईओ डॉ. कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा