देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुका केव्हाही लागण्याची शक्यता आहे. मुंबईसह अनेक महानगरपालिकांच्या निवडणुकांचा पेच असताना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून जय्यत तयारीही सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आज सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडलं आहे. एवढंच नव्हे तर, इंडिया आघाडी या सर्वांवर विजय मिळवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

देशभरातील सर्व हेलिकॉप्टर्स बुक

“मुंबईसह १४ महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार हे आता ब्रह्मदेव तरी सांगू शकेल काय? हा प्रश्नच आहे. हरण्याच्या भीतीने निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असा नवा ‘अ-लोकतांत्रिक’ पायंडा भाजप व त्यांच्या फुटीर महामंडळींनी पाडलेला दिसतो. पण लोकसभा निवडणुका मात्र वेळेच्या आधीच, म्हणजे डिसेंबर महिन्यातच घेतल्या जातील, असा दावा प. बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत देशभरातील सर्व हेलिकॉप्टर्स बुक करण्यास सुरुवात झाली आहे. खासगी, छोटी विमाने, हेलिकॉप्टर्स यांचे बुकिंग करून आपल्या राजकीय विरोधकांना कोंडीत पकडायचे. निवडणूक प्रचारासाठी कोणतीच वेगवान साधने विरोधकांना मिळू नयेत यासाठी सुरू असलेला सत्तेचा हा गैरप्रकार निषेधार्ह आहे”, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Uddhav Thackery News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सवाल, “पंतप्रधान मोदींनी महाकुंभात डुबकी मारली, पण गणपती विसर्जन करु देत नाही हेच तुमचं हिंदुत्व?”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “२०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही”, दिल्लीच्या निकालावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान
लाडक्या बहिणींची महायुतीकडून फसवणूक; दिलेली मते परत घेणार का, उद्धव ठाकरे यांचा सवाल
Uddhav Thackeray advocates for the 5 lakh women disqualified from the Ladki Bahin Schem
Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींसाठी उद्धव ठाकरेंनी उठवला आवाज, “दिलेले पैसे परत घेणार असाल तर…”
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Maharashtra Assembly Election , Konkan ,
विधानसभेतील पराभवानंतर कोकणात उद्धव ठाकरे गटाला गळती

हेही वाचा >> राष्ट्रवादीत खरंच फूट पडलीय का? किती आमदारांचा पाठिंबा? अजित पवारांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

…यात नवल काय?

“भाजपकडे व त्यांच्या पाठीराख्यांकडे अमर्याद साधनसंपत्ती आहे. ही संपत्ती कशा पद्धतीने येते याचे एक साधे उदाहरण आम्ही देतो. ‘चांद्रयान 3’ मोहिमेचा एकूण खर्च किती झाला? तर ६५० कोटी रुपये आणि दिल्लीतील द्वारका एक्सप्रेस वेच्या ३ किलोमीटर रस्त्याचा खर्च ७५० कोटींवर गेल्याचे उघड झाले. जे काम फार तर ७५ कोटींत व्हायला हवे ते ७५० कोटींवर गेले. मग मधल्या पाचशे कोटींचा हिशेब कोठे गेला? ते भाजपच्या तिजोरीत गेले की भाजप पुरस्कृत ठेकेदाराच्या खिशात? हा झाला फक्त ३ किलोमीटरचा हिशेब. त्या ३ किलोमीटरमागे ५०० कोटींची फावडेबाजी करणाऱ्यांनी निवडणूक प्रचारासाठी देशातील सर्व खासगी विमाने, हेलिकॉप्टर्स बुक करून ठेवली तर त्यात नवल ते कसले?”, अशी टीकाही त्यांनी केली.

सरकारच्या ज्योतिषांनी म्हणे …

“पुन्हा भाजपचे खासदार डी. अरविंद यांनी सांगितलेच आहे की, ‘ईव्हीएम’चे कोणतेही बटण दाबा, मत भाजपलाच पडत असते. याचा अर्थ असा की, सर्व हेलिकॉप्टर्सबरोबर लाखो ‘ईव्हीएम’ही भाजपने बुक करून ठेवलीत. त्याबाबतही त्यांचा वेगळा खर्च आणि हिशेब असणारच. अर्थात तुम्ही कितीही काहीही बुक केले तरी यावेळी मतदार भ्रष्ट ईव्हीएमच्या छाताडावर पाय ठेवून हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. विद्यमान लोकसभेची मुदत २०२४ मध्ये संपत असताना मोदी-शहा २०२३ सालात निवडणुका का घेतील? याचे उत्तर सोपे आहे. सरकारच्या ज्योतिषांनी म्हणे तसा सल्ला दिला आहे. आता हे ज्योतिषी आहेत की तांत्रिक-मांत्रिक हे त्यांनाच माहीत”, असा हल्लाबोलही ठाकरे गटाने अग्रलेखातून केला आहे.

हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांना शिक्षा होणार की निर्दोष सुटणार? ५ सप्टेंबरला सुनावणी, नेमकं प्रकरण काय?

भाजपा जर तिसऱ्यांदा सत्तेत आला तर…

“‘इंडिया’ आघाडीने २०२४ साली देशात सत्तापरिवर्तन करण्याचा विडाच उचलला आहे. हा ‘२०२४’चा वाईट काळ २०२३ च्या मावळतीस तंत्र-मंत्र, ईव्हीएम विद्येने नष्ट करता येईल काय? यावर म्हणे अंतस्थ गोटात खलबते सुरू आहेत. निवडणुका २०२४ ला करा नाहीतर २०२३ अखेरीस करा, मोदी-शहांच्या कुंडलीत राजयोग नाही व चोऱ्यामाऱ्या करून असे काही करण्याचा प्रयोग केलाच तर ते सर्व प्रकरण त्यांच्यावरच उलटेल. भाजपची हुकूमशाही कोणत्याही परिस्थितीत सत्तेतून पायउतार होणार आहे हे नक्की. श्रीमती ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले की, भाजपा जर तिसऱ्यांदा सत्तेत आला तर लोकशाहीचे पूर्ण उच्चाटन होऊन हुकूमशाही लागू केली जाईल. ममता बॅनर्जी यांची चिंता खरी आहे. मोदी-शहा व त्यांचे गुजरातच्या धनिक मित्रमंडळाने लोकशाहीचा गळा कधीच घोटला आहे”, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

लोकशाहीत जनता हीच नरसिंहाचा अवतार

“२०१४ सालापासून मोदी सरकारची पावले हुकूमशाहीकडे वळू लागली होती. २०१९ मध्ये त्यांनी लोकशाहीला जवळजवळ वधस्तंभावर लटकवले व आता २०२४ मध्ये वधस्तंभाचा खटका ते ओढतील ही भीती आहे. पण या देशाची चिंता भारतमातेस आहे. भारतमाता म्हणजे मोदी-शहा-अदानी नसून १४० कोटी जनता. ही जनता २०२४ मध्ये हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करून वधस्तंभावरील लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा करील. त्यासाठीच ‘इंडिया’ आघाडीने जन्म घेतला आहे. भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हादास दैत्य हिरण्यकश्यपूपासून वाचवण्यासाठी नरसिंह अवतार घेतला. दैत्य हिरण्यकश्यपूचा अंत नरसिंहाने ज्या भयंकर पद्धतीने केला तीच गत जगभरातील सर्वच हुकूमशहांची झाली. एक तर हुकूमशहांना देश सोडून पळून जावे लागले किंवा खवळलेल्या जनतेने त्यांच्या प्रासादात घुसून त्यांचा खात्मा केला. कारण लोकशाहीत जनता हीच नरसिंहाचा अवतार आहे. त्यामुळे २०२४ असो की २०२३, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे, असा इशाराही त्यांनी दिली.

हुकूमशाहीचा पराभव अटळ

“‘इंडिया’ आघाडीने देशाचे वातावरण ढवळून काढले आहे. जनता जागी झाली आहे व कोणत्याही भूलथापांना ती बळी पडणार नाही. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात त्याप्रमाणे भाजपने देशातील सर्व विमाने, हेलिकॉप्टर्स प्रचारासाठी बुक केली आहेत. आम्ही म्हणतो, त्यांना हवे ते करू द्या. त्यांनी ‘चांद्रयान 3’ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आणलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच. ओढून-चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे”, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

Story img Loader