कराड : कोयना शिवसागरात यंदाच्या एक जून या जलवर्षाच्या प्रारंभापासून गेल्या तीन महिन्यात १४१.०६ अब्ज घनफूट /टीएमसी (१३४.०२ टक्के) जल आवक, तर कोयना पाणलोटात ५,५१७.६६ घनफूट /क्युसेक वार्षिक सरासरीच्या ११०.३६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा बराच कालावधी शिल्लक असल्याने सरासरी पाऊस आणखी वाढणार आहे.

कोयना पाणलोटक्षेत्रातील पावसाची मुसळधार गेल्या चार- पाच दिवसात अगदीच ओसरल्याने धरणातून कोयना नदीपात्रात होणारा जलविसर्ग पूर्णतः बंद होताना, दुथडी वाहणाऱ्या कोयना, कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नद्या पात्रातून वाहू लागल्या आहेत.

Mumbai dust latest news in marathi
दोन महिन्यांमध्ये मुंबईतील पीएम २.५ धूलीकणांमध्ये वाढ
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rapid hair loss and baldness are caused by increased nitrate levels in water
केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल, पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढणे कारणीभूत!
mulund Dumping Ground Waste Processing Deadline Mumbai municipal corporation
मुलुंड क्षेपणभूमीची जून २०२५ची मुदत गाठण्यासाठी दरदिवशी १५ हजार मेट्रीक टन कचऱ्याच्या विल्हवाटीचे लक्ष्य
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Chandrapur air pollution annual statistics year 2024
चंद्रपुरातील प्रदुषणात घट; काय सांगते वार्षिक आकडेवारी? जाणून घ्या…
Ujani Dam, Ujani Dam Agriculture Water ,
उजनीतून एप्रिलपर्यंत शेतीसाठी पाण्याची तीन आवर्तने, पहिल्या आवर्तनासाठी १४.१७ टीएमसी पाणी
delhi fog flights stuck
दिल्लीत धुक्याची चादर, दृश्यमानता शून्यावर, १०० विमानांचा खोळंबा

हेही वाचा – Chandrakant Khaire : “महाराष्ट्रात दंगली का होत नाहीत? झाल्या पाहिजेत”, चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य

याखेपेस पावसाळ्याला वेळेत सुरुवात होऊन सलग तीन महिने पावसाची कामगिरी उत्तम राहिली आहे. १०५.२५ अब्ज घनफूट क्षमता असलेल्या कोयना शिवसागराचा जलसाठा आज रविवारी सायंकाळी पाच वाजता १०३.९५ अब्ज घनफूट (९८.७६ टक्के) असून, गतवर्षीच्या तुलनेत तो १७.७३ अब्ज घनफुटाने अधिकचा राहिला आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद ५,८६१ घनफूट पाण्याची आवक सुरू आहे.

हेही वाचा – Sharad Kelkar : “छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणं वेदनादायी”, अभिनेता शरद केळकरची हळहळ; म्हणाला,” या गोष्टीचं राजकारण…”

कोयना धरणाच्या १ जून या तांत्रिक वर्षाच्या सुरुवातीपासून यंदा आजवर कोयनेच्या सहा वक्री दरवाजातून आजवर विनावापर ३८.५३ अब्ज घनफूट पाणी (धरण क्षमतेच्या ३६.६० टक्के) कोयना नदीत सोडण्यात आले. तर, पायथा वीजगृहातील वीज निर्मितीसाठी ३.४४ अब्ज घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. सिंचनासाठी १,१६ अब्ज घनफूट, तर पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी १०.५९ अब्ज घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. एकूणच कोयनेचा पाणीसाठा, त्यातून वीजनिर्मिती आणि पाणलोटातील पर्जन्यमान समाधानकारक राहिल्याने कृष्णा- कोयना नद्यांकाठची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

Story img Loader