कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीच्या ऑनलाइन प्रक्रियेत नमुना आठ या अर्जाद्वारे स्थलांतर दाखवून वीज देयकात खाडाखोड करीत एकाच नावाने तब्बल ४६२ ऑनलाइन अर्ज दाखल झाल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. ऑनलाइन प्रणाली वापरकर्ता ‘सतीश सर’ नामक व्यक्तीवर शासनाच्यावतीने निवडणूक शाखेने शहर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.

कराड तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेच्या माहितीनुसार, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत निरंतर प्रक्रियेमध्ये ५ ते १३ सप्टेंबर या कालावधीत सतीश सर या ऑनलाइन प्रणाली वापरकर्त्याने एकाच नावाने हजारमाची (ता. कराड) येथील व्यक्तीच्या २० देयकांत खाडाखोड करून, स्थलांतरितांसाठी नमुना नंबर आठचे ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल केले.

Places Of Worship Act 1991 Supreme Court.
Places Of Worship Act : मंदिर-मिशिदींविरोधात ‘तोपर्यंत’ दाखल होणार नाहीत नवे खटले, सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
Satara District Sessions Judge detained for questioning in attempt to take bribe
लाच मिळविण्याच्या प्रयत्नात सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश चौकशीसाठी ताब्यात
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
mhada launch special campaign for sale of 11176 houses on first come first serve from 2nd december
म्हाडाच्या विशेष मोहिमेला अखेर चांगला प्रतिसाद; ५५०० जणांकडून घरासाठी चौकशी, प्रत्यक्षात २५० जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज केले दाखल
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
There has been demand for law requiring judges to disclose their assets like MPs and mlas
न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…

हेही वाचा – Sanjay Raut : लोकसभेतील यशानंतर काँग्रेस विधानसभेला एकटी लढणार? राऊत सूचक वक्तव्य करत म्हणाले, “आत्मविश्वास वाढलाय, पण…”

हेही वाचा – EY Employee Death : कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या तरुणीच्या आईसाठी कंपनीच्या अध्यक्षांचं पत्र, म्हणाले, “मी ही एक बाप…”

निवडणूक आयोगाने ३० ऑगस्ट रोजी एक जुलै या अर्हता दिनांकावर आधारित जाहीर केलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. या प्रसिद्धीनंतर निरंतर मतदार नोंदणीअंतर्गत नाव नोंदणी, दुरुस्ती, वगळणी व स्थलांतरित अर्ज दाखल करण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या पोर्टल आणि संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, या सुविधेचा गैरवापर करीत नमुना आठ अर्जाद्वारे सतीश सर नामक व्यक्तीने स्थलांतर दाखवून पोर्टलमध्ये ४६२ अर्ज दाखल केले. अर्जासोबत रहिवासाबाबत पुरावा म्हणून मारुती महादेव सूर्यवंशी (रा. हजारमाची) यांचे वीज देयक व त्यावरील ग्राहक क्रमांक चार अंकामध्ये व्हाइटनरच्या साह्याने खाडाखोड केली. पुराव्याची कागदपत्रे सदराखाली खाडाखोड केलेले वीज देयक ऑनलाइन अपलोड केले. निवडणूक शाखेने कागदपत्रांची पडताळणी केली असता, ही बाब निदर्शनास आल्याने लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील कलम ३१ या कायद्यातील तरतुदीचा भंग केल्याप्रकरणी सतीश सर नामक व्यक्तीवर निवडणूक शाखेने कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader