मित्रासोबत फिरायला गेलेली तरुणी नीरा नदीच्या पात्रात वाहून गेल्याने शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.हात-पाय धुण्यासाठी ती उतरली असता तोल जाऊन नदीपात्रात घसरून पडली आणि वाहून गेली. नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे ती वाहून गेली. ही घटना हरतळी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत घडली.

तेजल ऊर्फ तेजू आप्पासो साळुंखे (वय २३, रा. वरुड, ता. खटाव, जि. सातारा, सध्या रा. भोर, जि. पुणे) असे नीरा नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे.पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील वेलवंडी नदी व नीरा नदीच्या संगमावर भाटघर धरण आहे. धनगरवाडी हद्दीत असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणारी तेजल साळुंखे ही कंपनीतील मित्र दिगंबर साळेकर (रा. निगुडघर, ता. भोर, जि. पुणे) याच्यासमवेत फिरण्यासाठी आली होती. यावेळी नीरा नदीच्या पात्रात असणाऱ्या पाॅवर हाऊसमधून १६३४ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. एका पुलाजवळ नदीपात्रात तेजल साळुंखे ही हात-पाय धुण्यासाठी उतरली. त्यावेळी पाय घसरून पाण्यात पडल्याने ती वाहून गेली.

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
mmrda squad action on three warehouse of sneha patil after file nomination as a independent candidate
स्नेहा पाटील यांच्या बंडखोरीनंतर गोदामांवर कारवाई
Resolution to grant special status to Jammu and Kashmir approved
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर; विधानसभेत जोरदार खडाजंगी
Widening of Uran-Panvel road to be fourteen meters soon
उरण-पनवेल मार्ग लवकरच चौदा मीटर, सात कोटींच्या कामाची निविदा आचारसंहितेत अडकली
pick up tempo fell in creek while being loaded into boat in Raigad
Video : रायगडमध्ये बोटीत चढवतांना पिकअप टेम्पो खाडीत पडला… घटना सीसीटीव्हीत कैद
41 lost mobile returned to complainant by pune police on the occasion of diwali
हरवलेले ४१ मोबाइल संच तक्रारदारांना परत; दिवाळीनिमित्त पोलिसांकडून अनोखी भेट

नीरा नदी पात्रात मुलगी वाहून गेल्याचे समजताच शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने उपनिरीक्षक वृषाली देसाई भोरचे तहसीलदार सचिन पाटील आदींनी घटनास्थळी भेट केली महाबळेश्वर ट्रेकर्स प्रतापगड व शिरवळ रेस्क्यू टीम नदीपात्रात शोध घेत आहेत.