सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर दुय्यम दर्जाचे हेल्मेट परिधान केलेल्या भरधाव दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील भरत चिमन्ना (वय २९) हा उच्चशिक्षित तरुण मुलाखतीसाठी दुचाकीवरून पुण्याला जात होता. यावेळी त्याची दुचाकी ट्रकला पाठीमागून धडकली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सुरूर (ता. वाई) गावाच्या हद्दीत घडली.

हेही वाचा – बँक बंद झाल्याने संतप्त खातेदाराने टाळे ठोकत कर्मचाऱ्यांना डांबले, सोलापुरातील प्रकार, ग्राहकाविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – Sangamner News Update: “माझ्या मुलाच्या सभेत विकृती…”, भाजपा नेत्याच्या अश्लाघ्य विधानानंतर सुजय विखेंच्या आई शालिनी विखे संतापल्या

या अपघातात त्याने दुय्यम दर्जाचे हेल्मेट घातल्याने ट्रकला धडकताच त्याच्या हेल्मेटचा चक्काचूर झाला. त्याला शरीराला कुठेही दुखापत झालेली नव्हती. मात्र, हेल्मेटच्या पुढच्या भागाला ट्रकचा रंग लागलेला होता. पोलीस आणि आरटीओचा दंड व कारवाई टाळण्यासाठी अनेकदा दुय्यम दर्जाचे हेल्मेट वापरले जाते. त्यामुळे अशा अपघातावेळी हेल्मेटचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे प्रमाणित कंपन्यांचे हेल्मेट वापरणे गरजेचे असल्याचे महामार्ग पोलिसांनी व भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी सांगितले.