वाई: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राच्या मातीत अनेक चळवळी उदयास आल्या, त्यामध्ये स्त्री शिक्षण, सत्यशोधक समाज, प्रतिसरकार यांचे मोठे योगदान देशाच्या उभारणीत झाले आहे. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांनी देखील देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. परकीय आक्रमणाच्या काळात त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रीपद भूषवले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे त्यामुळेच म्हटले जाते. यशवंत विचार हा लोककल्याणाचा विचार आहे.
काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला पण त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत. एवढे मोठे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेले तरी देखील काँग्रेसला भारतरत्न पुरस्कार देण्याचे सुचले नाही. काँग्रेसला ‘आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माईंड’ हे सूत्र लागू होतं. यशवंतरावांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे कर्तव्य आम्ही पार पडणार आहोत असं उदयनराजे म्हणाले. तसेच काही लोकांनी स्वार्थापुरता यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला, त्यांनाही यशवंतरावांना भारतरत्न द्यावा असे वाटले नाही अशी अप्रत्यक्ष टीका शरद पवार यांच्यावर केली. त्यांनी नाव न घेता काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली.

हेही वाचा – नाशिकच्या जागेबाबत संजय शिरसाटांचं मोठं विधान; म्हणाले, “उद्या दुपारपर्यंत…”

हेही वाचा – भांडण सोडवायला गेला आणि जीव गमवून बसला; अलिबाग तालुक्यातील बुरूमखाण येथील घटना

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दि २९ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत जाहीर सभा होणार आहे. या सभेतच यशवंतरावांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणार असल्याचंही उदयनराजे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara bharat ratna award should be given to yashwantrao chavan udayanraje bhosale will make a recommendation to modi ssb
Show comments