सातारा पालिकेत घंटा गाडीच्या ठेक्याची पंधरा लाख रुपयांचे अनामत परत करण्यासाठी, दोन लाख ३० हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी पालिकेचे उप मुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्यासह दोघांची न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तर, एकजण फरार झाला आहे.
कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडी ठेकेदाराकडून १५ लाख रुपयांची अनामत रक्कम मिळण्यासाठी पालिकेचे उप मुख्याधिकारी संचित धुमाळ,आरोग्य निरीक्षक गणेश टोपे व प्रवीण यादव यांनी लाचेची मागणी केली होती.सोमवारी कार्यालयातच दोन लाख ३० हजारांची लाच घेताना धुमाळ यांना पकडण्यात आले होते.
या प्रकरणी या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात राजेंद्र कायंगूडे फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. पालिका कार्यालयात लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. यामुळे सातारा शहरात खळबळ उडाली होती. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के व निरीक्षक जगताप यांनी केली.