वाई: सातारा जिल्ह्यने ९७.४४ टक्के वितरण करुन आनंदाचा शिधा वितरणामध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे .राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला होता.
हेही वाचा >>> पालकमंत्री शिंदे गटाचे असताना शेतकरी संघाचे कुलूप तोडण्याचे धाडस केलेच कसे? हसन मुश्रीफ यांची विचारणा
पुसेसावळी दंगलीच्या वेळी साताऱ्यात तीन दिवस नेट सुविधा बंद असतानाही सर्व पुरवठा विभाग अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आनंदाचा शिधा वितरणामध्ये ९७.४४ टक्के वितरणासह राज्यात प्रथम क्रमांकावर आल्याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. सातारा जिल्ह्यात तीन लाख ८८ हजार ९०७ पात्र शिधापत्रिकांधारकांपैकी तीन लाख ७८ हजार ९३४ शिधापत्रिकाधारक कुटूंबाना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्या पाठोपाठ भंडारा जिल्ह्याने ९७.३७ टक्के तर गोंदिया जिल्ह्याने ९६.५३टक्के वितरण करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.