सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी मेढा येथील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋशिकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे यांच्यात आज मतदान केंद्रावरच वादावादी झाल्याचे झाली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मतदान केंद्रांवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज सकाळी आठ वाजल्यापासून सातारा जिल्ह्यात बँकेच्या मतदानास सुरवात झाली. मेढा येथेही जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीत मतदानास सुरुवात झाली. बँकेच्या निवडणुकीसाठी जावळी सोसायटी मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशीकांत शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जावळतील कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांच्यात लढत आहे. या निवडणुकीकडे सातारा जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळपासूनच मेढा या मतदान केंद्रावर कमालीचे तणावपूर्ण वातावरण होते. दोन्ही गटांकडून विजयाचा दावा केला जात असून दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते मेढा या ठिकाणी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. याठिकाणी निवडणुकीत चुरस असल्याने पोलिसांनी मोठया प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्स, आदी मिळून शंभरहुन अधिक पोलिस मतदान केंद्रावर उपस्थित होते. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव मानकुमरे व अर्चना रांजणे यांनीह मतदान केंद्राकडे कार्यकर्त्यांसह गर्दी केली. यावेळी ऋषिकांत शिंदे आणि वसंतराव मानकुमरे व कुडाळचे प्रतापगड कारखाना संचालक मालोजीराव शिंदे यांच्यात वादावादी झाली . पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार शिंदे व रांजणे दोघांनीही मध्यस्थी करून कार्यकर्त्यांन शांत करण्याचा प्रयत्न केला. वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले.

मतदान केंद्रावर आमदार शशीकांत शिंदेंचे बंधु ऋषीकांत शिंदे हे त्यांच्या समर्थकांसह आले होते. त्यावेळी मतदानासाठी आलेले वसंतराव मानकुमरे व त्यांचे समर्थक समोरासमोर आले. त्यामुळे दोन्ही गटात एकमेकांना दम देण्यावरून वाद सुरू झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्राच्या शंभर मीटर बाहेर जाण्याची सूचना केली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानात संघर्ष पहायला मिळाला. विशेषत: सोसायटी मतदारसंघांत टोकाचा संघर्ष निर्माण झाला असून मतदार पळवापळवी झाल्याचे दिसून आले. मतदार आज थेट मतदान केंद्रांवरच दाखल झाले. यामुळे जोरदार वादावादी झाल्याने जावळीत तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara district bank election mla shashikant shinde and dnyandev ranjane are arguing in the group msr