सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालात दिग्गजांनाच धक्का बसला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे आणि गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई या दोन दिग्गजांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जातो. यातही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे यांचा झालेला पराभव पक्षात गेले काही दिवस सुरू असलेली बंडाळी चव्हाटय़ावर आणणारा आहे. त्यामुळेच शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन त्यांची भेट घेतली. शिंदे यांच्या पराभवासंदर्भात पवार आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये साताऱ्यामधील सर्किट हाऊसमध्ये चर्चा झाली. या चर्चेला विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांना राष्ट्रवादी सोडण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा