वाई : जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हा रुग्णालयात ब्लड बँकेप्रमाणेच मिल्क बँकही तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळून लहान मुलांची योग्य वाढ होण्यास मदत होणार आहे. यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पुढाकार घेतला आहे.
मातेचे पुरेशे दूध न मिळणाऱ्या बालकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे देशाची भावी पिढी सुदृढ करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आईचे दूध हाच बाळाचा सर्वात उत्तम आहार आहे. त्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच ॲलर्जी व दम्यापासूनही बचाव होण्यास या दुधाची मदत होते. भावी आयुष्यात स्थूलता, रक्तदाब, हृदयविकार व मधुमेह अशा आजारापासून बाळाला संरक्षण मिळते. जीवनसत्त्वे, क्षार आणि रोगप्रतिबंधक घटक असतात. त्यामुळे बाळासाठी आईच्या दुधाची तुलना इतर कुठल्याही दुधाशी करता येत नाही. हे दूध पचायला हलके असते. बाळाच्या वाढीस जरूर असणारे सर्व पोषक घटक योग्य त्या प्रमाणात असतात. बाळाला कावीळ, जुलाब आदी आजारांपासून संरक्षण मिळते,
अनेक महिलांना पुरेशा प्रमाणात दूध येत नाही. त्यासाठी विविध औषधे, खाण्यापिण्यातील बदल असे उपाय करूनही आईला पुरेसे दूध येत नाही. काही घटनांमध्ये आईचा आजार विचारात घेऊन बाळाला दूध पाजता येत नाही, तर क्वचित घटनांमध्ये आईला धोका निर्माण झाल्यावरही बाळ तिच्या दुधापासून वंचित राहते. त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होत असतो. ते आजारी पडण्याचे प्रमाण वाढू शकते. त्याच्या आरोग्यावर विपरित परिणामांना सामोरे जावे लागू शकते. रक्त रासायनिक प्रक्रियेतून तयार करता येत नाही. त्यामुळे रक्तदानाची व ते साठविण्यासाठी ब्लड बँकेची संकल्पना पुढे आली त्यामुळे अनेकांचे जीव वाचवणे शक्य झाले. त्याचप्रमाणे आईच्या दुधाच्या बँकेची कल्पना पुढे आली आहे. दुधाएवढ्या ताकदीचे कोणतेही दूध अद्याप तयार करता आलेले नाही.
हेही वाचा – लातूरमध्ये सीबीएससी शाळेत प्रवेश घेणे शक्य नसल्याच्या नैराश्येतून आईची मुलीसह आत्महत्या
आईच्या दुधात जीवनसत्त्वे, क्षार आणि रोगप्रतिबंधक घटक असतात. त्यामुळे बाळासाठी आईच्या दुधाची तुलना इतर कुठल्याही दुधाशी करता येत नाही. हे दूध पचायला हलके असते. बाळाच्या वाढीस जरूर असणारे सर्व पोषक घटक योग्य त्या प्रमाणात असतात. बाळाला कावीळ, जुलाब आदी आजारांपासून संरक्षण मिळते. कोल्हापूरमध्ये अशी बँक तयार करण्यात आली आहे. त्याचा लाभ अनेक बालकांना मिळतो. त्या संकल्पनेवर आधारित इथला प्रकल्प होणार आहे. जास्त दूध असणाऱ्या मातांची मदत या प्रकल्पासाठी घेतली जाणार आहे. तिच्या मुलाचे पूर्ण पोट भरल्यानंतर शिल्लक राहणारे दूध वाया घालवण्यापेक्षा ती या मिल बँकेत साठवून ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर अनेक मातांचा गर्भपात होतो. काहींचे मूल दगावते अशावेळी त्यांना आलेले दूध हे पिळूनच काढावे लागते. या दुधाचाही उपयोग केला जाणार आहे. या दुधावर मिल्क बँकेत प्रक्रिया करून ते कमी दूध असणाऱ्या मातांच्या बाळासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात अशी बँक तयार करण्याचा प्रस्ताव बालरोग तज्ञ डॉ अरुंधती कदम यांनी मंजुरीसाठी पाठवला होता. परंतु करोना संसर्गामुळे याला वेळ लागला आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वाधिक प्रसूती होत असतात. त्यामुळे साताऱ्यातील हा पहिला प्रकल्प जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात एक हजार स्क्वेअर फूट जागा लागणार आहे. ती उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांची मदत घेतली जाणार आहे.
हेही वाचा – “मोदींपेक्षा जास्त मतं आमच्या सुप्रियाला मिळाली”, शरद पवारांनी मानले बारामतीकरांचे आभार
सातारा जिल्ह्यात मिल्क बँकेचा प्रकल्प नाही. त्यामुळे दूध कमी असणाऱ्या मातांच्या बाळांच्या वाढीवर मर्यादा येतात. त्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. कोल्हापूरमध्ये असलेल्या अशा प्रकल्पाच्या पाहणीसाठी नुकतेच एक पथक पाठविले होते. येत्या दोन दिवसांत त्यावर चर्चा करून प्रकल्पाला अंतिम स्वरूप देणार आहे. – याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा.