सातारा : ‘लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांना लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे,’ अशी माहिती लाचलुचपत विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे यांनी दिली.

हेही वाचा : पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल

पुणे येथील एका तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आनंद मोहन खरात, किशोर संभाजी खरात, जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. तक्रारदार तरुणीचे वडील एका गुन्ह्यात सातारा जिल्हा कारागृहात आहेत. त्यांच्या जामिनावर जिल्हा सत्र न्यायालयात धनंजय निकम यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. ‘संशयित आनंद व किशोर खरात यांनी जिल्हा सत्र न्यायाधीशांशी संगनमत करून एका अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून जामीन अर्जासाठी मदत करण्याच्या बदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार ३, ९ आणि १० डिसेंबर रोजी घडला,’ असे तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के तपास करीत आहेत. ‘याबाबत योग्य ती चौकशी करून माध्यमांना सर्व माहिती दिली जाईल,’ असे डॉ. शीतल जानवे खराडे यांनी सांगितले.

Story img Loader