राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. या दरम्यान विधानभवनाबाहेर एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. सुभाष भानूदास देशमुख, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेत गंभीररित्या भाजलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे देशमुख यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. देशमुख हे साताऱ्याच्या कांदळगावचे रहिवासी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हे सरकार गरीबांच्या टाळूवरील लोणी खाणारं…” नाना पटोलेंची सरकारवर टीका, गुन्हे दाखल करण्याचीही मागणी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू असताना विधिमंडळाबाहेर हा प्रकार घडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांनी आणि घोषणाबाजीने अधिवेशन चांगलच गाजत आहे. राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक गावांमध्ये शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. काही गावांमध्ये जनावरं दगावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून विधानभवनात करण्यात आली आहे.

‘गोविंदा’च्या सातव्या थरावरून ‘माझं बाळ’ कोसळलं तेव्हा…

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील शिंदे-भाजपा सरकार असंवेदनशील आहे. त्यांच्या कृत्यामुळेच राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाईची मागणीही त्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara farmer attempted suicide outside maharashtra assembly today rvs