सातारा जिल्हा जम्बो कोविड रुग्णालया बाहेर वाहनातून आलेल्या काही जणांनी काठ्या आणि गजाचा वापर करत दोन जणांना मारहाण केली. या मारहाणीत महिला पोलीस कर्मचाऱ्यासह तीन जण जखमी झाले. यामुळे रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला. वैद्यकीय कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

सातारा कोविड सेंटरच्या आवारात बुधवारी दुपारी वाहनातून लाठ्या व लोखंडी गज घेऊन काही जण गाडीतून उतरले. त्यांनी या परिसरात उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये गर्दीत लपून बसलेल्या दोघांना शोधून काढले. यानंतर या दोघांना त्यांनी लाठ्या व लोखंडी गजाचा वापर करत मारहाण केली. त्यानंतर मारहाण करणारे वाहनातून लगेच निघून गेले. यावेळी दोघेजण जखमी झाले तर मारहाण सोडवायला गेलेल्या महिला पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्या.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Vishal Gawli Sakshi Gawli the killers of a minor girl in Kalyan remanded in police custody till January 2 kalyan news
कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल, साक्षी गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल
Macoca , Demand of Marathi family,
मराठी कुटुंबांना मारहाण करणाऱ्या मुख्यसुत्रधारासह मारेकऱ्यांना ‘मोक्का’ लावा, मराठी कुटुंबीयांची पोलिसांकडे मागणी

या प्रकाराने रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला. वैद्यकीय कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले . या प्रकारची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. मारहाण झालेल्या आदिक बैजू काळे व एकनाथ बैजू काळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्या दोघांपैकी एक जण गंभीर जखमी आहे. कौटूंबिक वादातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

करोनावर उपचार होणाऱ्या रुग्णालयाच्या आवारात रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. या परिसरात झालेल्या प्रकाराने परिसरातील सगळेच आश्चर्यचकित व भयभीत झाले. यामुळे कोविड रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. या ठिकाणी रुग्णालयातील ४०० रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाच्या आजूबाजूला बसून असतात. त्यामुळे या परिसरात कोणालाही अनावश्यक प्रवेश देऊ नये. दरवाजातून आत येणाऱ्या प्रत्येकाची नोंद करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांनी आज केली. याप्रकरणी अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत.

Story img Loader