कराड : सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यांसह कोयना पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु असून, धरण निम्म्याने भरण्याच्या मार्गावर आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर दमदार पाऊस कायम आहे. कोयनेचा जलसाठा साडेतीन टीएमसीने वाढून ४८.६४ टीएमसी (४६.२२ टक्के) झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – सांगली : निकाल विरोधात दिला म्हणून अप्पर तहसीलदारांना मारण्याची धमकी

हेही वाचा – नीलेश लंकेंच्या निवडीला सुजय विखेंकडून आव्हान

आज शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या नऊ तासांत कोयना धरणक्षेत्रात १६५ मिलीमीटर (साडेसहा इंच) एकूण २,२८८ मिलीमीटर (वार्षिक सरासरीच्या ४५.७६ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. तर, कुंभी धरणक्षेत्रात ३० मिलीमीटर, कास १७, कडवी ७०, दुधगंगा ६१, वारणा २९, तारळी १५ धोम- बलकवडी ८, उरमोडी धरण परिसरात ५ तर ठोसेघर धबधबा २५ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. अन्यत्र, गजापुरला ९५ मिलीमीटर, सावर्डे ६३, निवळे ५१, जांभूर ४८, जोर ४७, वाकी ५०, वाळवण ४८, पाथपूंज ४३, दाजीपुर ४२, पाडळी ६०, रेवाचीवाडी येथे ३३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara heavy rain in koyna the dam is about half full ssb
Show comments