कराड : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणांतर्गत कराड शहरालगत सुरू असलेले काम पोटठेकेदार कंपनीने पगार थकवल्याने कामगारांनी बंद पाडले. परिणामी वाहतूक कोंडी, अपघात, खड्डे, धूळ आदी समस्यांमुळे वर्षभरात ८० जणांचा बळी जाताना, तासनतास वाहनांच्या रांगामुळे स्थानिक जनतेसह वाहनधारकांचे होत असणारे हाल कायम राहणार आहेत.

सोमवारी (दि. १३) कराड उड्डाणपूल, कोयना नदीवर उभारण्यात येणारा पूल आणि धोंडेवाडी (ता. कराड) येथील कंपनीच्या कास्टिंग यार्डवरील कामगारांनी थकीत पगार आणि नऊ महिन्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम गोठवल्याने संतप्त होवून हे काम बंद आंदोलन पुकारले.

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News LIVE Updates : खंडणी प्रकरणात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे; वाल्मिक कराडच्या वकिलांची माहिती
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

कराड शहर हद्दीतून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे बहुतांशी काम पूर्णत्वाकडे तर अन्यत्र प्रगतीवर असल्याने वाहतूक कोंडीमुळे सुट्ट्यांच्या दिवशी लागणाऱ्या कित्येक किलोमीटरच्या रांगाचा प्रश्न निकाली निघेल, वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल, असे चित्र दृष्टीपथात असतानाच अचानक ‘कामबंद’च्या संकटामुळे स्थानिक लोक व वाहनधारक हवालदिल होणार आहेत.

संबंधित कंपनीकडून अनेक महिन्यांपासून कामगारांना एक महिनाआड पगार दिला जातो, नऊ महिन्यांचा तीन कोटी रुपयांचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीही (पीएफ) कामगारांच्या खात्यावर जमा केलेला नाही. त्यामुळे संतप्त कामगारांनी सोमवारी कंपनीविरोधात काम बंद आंदोलन पुकारले. त्यात ७०० कामगारांचा सहभाग असून, सदर कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याची भीती कामगारांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर

महामार्गाच्या विस्तारीकरणात कराडजवळील युनिक उड्डाणपुलाच्या कामाची मुदत ३१ डिसेंबरला संपली असून, संबंधित कंपनीला मुदतवाढ मिळाली असतानाही कामाचा घोळ कायम असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कराड शहरालगत उड्डाणपुलाचे काम जवळपास ८० टक्के काम पूर्ण आहे. या महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी कंपनीचे अभियंता, वाहनचालक, ऑपरेटर व अन्य कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, कंपनीकडून हातावर पोट असलेल्या या कामगारांचे पगार थकवल्याने आमचे हे तिसरे आंदोलन असल्याचा दावा कामगारांनी केला आहे.

डॉ. अतुल भोसलेंकडून दिलासा

या प्रश्नी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आणि शासन, प्रशासनातील वरिष्ठांशी बोलून ही अडचण तत्काळ दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, लवकरच प्रकल्प ठेकेदार व प्रशासनाची बैठक घेणार असल्याचे लोकसत्ता वार्ताहराशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

व्यवस्थापकाकडून तोडग्याचा विश्वास

दरम्यान, संबंधित कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सत्येंद्र वर्मा यांच्याशी संपर्क साधला असता कामगारांचे पगार थकल्याने कामबंद आंदोलन घडल्याचे मान्य करताना, कामगारांशी वरिष्ठ अधिकारी चर्चा करीत असून, त्यावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी दिला.

Story img Loader