वाई : पंतप्रधान कार्यालयात सुरक्षा सल्लागारपदी कार्यरत असल्याची बतावणी करून लोकांना गंडा घालणारी साताऱ्यातील जोडी कश्मिरा पवार व गणेश गायकवाड या दोघांना आज सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात ८२ लाखांच्या फसवणूकप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. त्यांना सातारा येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुण्यातील बंड गार्डन परिसरातील एका बांधकाम व्यासायिकाने याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर सातारा पोलिसांनी कश्मिरा पवार व गणेश गायकवाड यांना अटक केली आहे. तब्बल ५० लाखांचा गंडा घालणारी ही जोडी अखेर पोलिसांच्या हाती लागली. शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी आज दुपारच्या सुमारास सदरबझार येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. या जोडीने साताऱ्यातील एकाला विविध प्रकारच्या भूलथापा देऊन त्याची ८२ लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्यांना सातारा येथील न्यायालयात हजर केले असता पुढील दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा – साताऱ्यातील कश्मिरा पवारची ‘घोटाळा’झेप; आधी उत्तुंग कामगिरीच्या बातम्या, नंतर फसवाफसवी झाली उघड!

कश्मिरा पवार व गणेश गायकवाड यांनी सातारा, वाई, महाबळेश्वर, फलटण, कोरेगाव, कराड येथील अनेक धनिकांना वेगवेगळी कामे करतो असे सांगून फसवणूक केली आहे. ही रक्कम काही कोटींमध्ये आहे. आपल्या नावाची चर्चा नको व आपली फसवणूक झाली आहे याची चर्चा होईल म्हणून या धनिकांनी पोलिसात कोणतीही तक्रार केलेली नाही.

हेही वाचा – सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात हजारो वृक्षांची कत्तल, मुनावळे येथील धक्कादायक प्रकार उघड

जिल्ह्यातील अनेक बँकातून या व्यक्तींच्या नावावर वेगवेगळ्या माध्यमातून रक्कम दिली (ट्रान्सफर) गेली आहे. मात्र याबाबत पोलीस पातळीवर याचा तपास सुरू आहे, अशी माहिती सातारा शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी दिली.