कराड : सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यांसह पश्चिम महाराष्ट्रात गतखेपेच्या तुलनेत भरघोस पाऊस झाला आहे. त्यात जलसाठे भक्कमस्थितीत आले असून, कोयना धरणात गेल्या वर्षीपेक्षा जवळपास १४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची जादाची आवक होवून हा जलसाठा दीडपट अधिकचा राहताना निम्म्यावर भरला आहे. कोयना पाणलोटात ४८.८० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

छोटे जलसाठे भरले

सध्या वांग- मराठीवाडी, कास, मोरणा, जांबरे, घटप्रभा, आंबेओहोळ, जंगमहट्टी ही छोटी जलाशय भरून वाहिली आहेत. कडवी, पाटगाव, चित्री ही धरणे लवकरच भरण्याची चिन्हे आहेत.

vasai palghar forest area
वसई, पालघरचे वनक्षेत्र ३५ टक्क्यांनी घटले, भूमाफियांकडून जंगलतोड
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Forest Minister Ganesh Naik Navi Mumbai MIDC
नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Loksatta kutuhal Why only two rivers flow west
कुतुहल: दोनच नद्या पश्चिमेकडे का वाहतात?
Ujani Dam, Ujani Dam Agriculture Water ,
उजनीतून एप्रिलपर्यंत शेतीसाठी पाण्याची तीन आवर्तने, पहिल्या आवर्तनासाठी १४.१७ टीएमसी पाणी
Large fluctuations in weather in Gondia state
महाराष्ट्राच्या सीमेवरील या शहरात सर्वाधिक थंडी…पारा तब्बल…

हेही वाचा – अक्कलकोटमध्ये गुरूपौर्णिमेसाठी लाखाहून जास्त भाविक दाखल

रस्ते पाण्याखाली; दरडीही कोसळल्या

संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाण्याचे साम्राज्य राहताना महामार्गावरील कमी उंचीचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरडी कोसळून, झाडे उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होताना ओढे, नाले, तलाव, विहिरी, कुपनलिका असे सर्वच जलस्त्रोत वाहते झाले आहेत.

कोयना निम्म्यावर भरले

पश्चिम घाटासह कोयना पाणलोटात तीन-चार दिवसांपासून सलग जोरदार पाऊस सुरु आहे. कोयना शिवसागराचा १०५.२५ टीएमसी क्षमतेचा जलसाठा गेल्या २४ तासात चार टीएमसीने वाढून हे जलविद्युत व सिंचनासाठी महत्वाचे धरण निम्म्यावर भरले आहे. गतवर्षी ते आजमितीला एकतृतीयांशच भरलेले होते.

हेही वाचा – वाई, कराड उत्तरेत कामाला लागा – उपमुख्यमंत्री अजित पवार; साताऱ्यात पदाधिकाऱ्यांना सूचना

पाथरपुंजलाच सर्वाधिक पाऊस

यंदा आजवरच्या एकूण पर्जन्यमानात पाथरपुंज येथेच सर्वाधिक ३१७० मिलीमीटर (१२४.८० इंच). खालोखाल दाजीपुरला ३,०२८ (११९.२१ इंच) तर, नवजाला २,७९९ (११०.१९ इंच) पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसभरात कुंभी धरणक्षेत्रात ६० मिलीमीटर, कडवी ४४, दुधगंगा ३०, वारणा २२, तारळी २१ मोरणा २१, धोम- बलकवडी २०, उरमोडी धरण परिसरात १२ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. अन्यत्र, गजापुरला सर्वाधिक ७२ मिलीमीटर, गगनबावडा ६३, जोर ६२, पाथरपुंज ५९, हसणे व सावर्डे ५५, सांडवली ४५, कटी ४२, रेवाचीवाडी येथे ५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Story img Loader