सातारा : साताऱ्यात पश्चिम भागात मागील तीन महिन्यांपासून मुसळधार पाऊस राहिला. यामुळे कोयना, धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर भरले आहे. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. धरणे भरल्याने वर्षभराची चिंता मिटली आहे. साताऱ्यात जून महिन्यात वेळेवर पाऊस सुरू झाला तर पुढे फारशी चिंता राहत नाही. कारण, पेरण्यांना वेळेवर सुरुवात होते. तसेच धरण, पाझर तलावातही पाणीसाठा वाढतो. मागील वर्षी मात्र, पावसाने चिंता वाढवली होती. मागील वर्षी वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी यांसारखे मोठे पाणीप्रकल्प पूर्ण भरले नव्हते.

जिल्ह्यात मागील वर्षी २८ ऑगस्टपर्यंत प्रमुख सहा प्रकल्पांत १२१.११ टीएमसी पाणीसाठा झाला होता. यामध्ये तारळी, धोम, बलकवडी आणि कण्हेर धरणांत चांगला साठा होता. तर कोयना धरणात ८१ टक्क्यांवर पाणीसाठा होता. तर उरमोडी धरणात अवघे ६ टीएमसी पाणी होते. सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झालेला होता. त्यावेळी धरणे तळाला गेली होती. त्यामुळे यंदा धरणे भरणार का? अशी चिंता होती. पण, मागील तीन महिन्यांत सतत पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे. पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी असे प्रमुख सहा मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात १४८.७६ टीएमसी पाणीसाठा होतो. तर पूर्व भागातही नेर, आंधळी, पिंगळी, राणंद, येळीव असे लहान प्रकल्प आहेत. यावर्षी या सर्वच प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. पश्चिमेकडील सर्वच प्रमुख धरणे काठावर आली आहेत. सहा प्रकल्पात सध्या १४५.४५ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा – सांगली : एका पराभवाने खचणारा मी नाही! संजयकाका पाटील यांचे विधानसभेसाठी सुतोवाच

हेही वाचा – Carrying Beef In Nashik Train: नाशिक: गोमांस बाळगल्याच्या संशयावरून ट्रेनमध्ये तरुणांची वृद्धाला मारहाण; गुन्हा दाखल

सर्वांत मोठे कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी असून धरणातील पाणीसाठा ९८.२५ टक्क्यांवर गेला आहे. याशिवाय धोम, बलकवडी, तारळी उरमोडी ही धरणेही भरली आहेत.