वाई: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोणंद आठवडा बाजारात बोकड व बकरीची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली. लोणंद बाजार समितीच्या आवाराला बोकड व बकरीच्या आजच्या बाजाराला जत्रेचे स्वरूप आले होते. बाजारात कोट्यावधी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली.

लोणंद बाजार समितीच्या बकरी व बोकड, जनावरे गुरुवारच्या बाजारात गर्दीच गर्दी झाली होती. पहाटे पाचपासून बाजार आवारावर दुचाकी, चार चाकी, व ट्रकमधून शेळी, मेंढी, बकरी व बोकड आवक विक्रीसाठी येत होती. त्यामुळे आजच्या बाजारात बकरी व बोकडांची सुमारे पाच, दहा, पंधरा ते वीस हजार, एक लाखांपर्यत बोली झाली. एका बोकडाची किंमत एक लाखापेक्षा जास्त गेली होती. तर आजच्या बाजारात कित्येक कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज लोणंद बाजार समितीचे सभापती सुनिल शेळके – पाटील यांनी व्यक्त केला.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला

हेही वाचा – “…त्या अपेक्षा बर्‍याचदा फोल ठरतात”, किरण मानेंची आदित्य ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाले, “ज्यांचे बापजादे…”

बाजारात बकरी व बोकड खरेदीसाठी कर्नाटक, गोवा, राज्यासह हुबळी, घारवाड, बेंगलोर, कोकणातील महाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आदी भागातील सुमारे पंधरा ते वीस हजारांपर्यंत खरेदीदार आले होते. तर वाहनांची संख्याही मोठी होती. बाजारात वीस हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत बोकड विकला गेला. मात्र बाजार समितीकडे ५५ हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीची नोंद प्रत्यक्षात झाली. ५१ हजार रुपयांच्या पुढे व्यवहार झाले की फटाके फोडले जात होते. साधारणपणे २५ ते ४० हजार रुपये किमतीपर्यंतच्या बोकडांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री झाली. त्यामुळेच बाजारात कोट्यावधींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – “गालिब ये खयाल अच्छा है! देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेवर काँग्रेसचे प्रत्युत्तर!

बकरी ईदच्या बाजारात बकरी व बोकड खरेदी विक्री उलाढालीतून मोठा सेस बाजार समितीला जमा होईल, असे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी सांगितले. आजच्या बाजारात मोठ्या संख्येने खरेदीदार व विक्रीदार आल्याने या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.