वाई: पोलिस अधीक्षक समीर शेख कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिदिनाच्या कार्यक्रमांनंतर सातारला येत असताना त्यांच्या समोर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली गेली. क्षणभर वेळ न घालवता त्यांनी  संबंधित दुचाकीस्वारांचा जीव वाचला आणि अपघातानंतर होणारी वाहतूक कोंडी सुद्धा टाळली.कराड येथील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रमानंतर महामार्गावरून  सातारच्या दिशेने निघालेल्या जिल्हा पोलिस प्रमुखांसमोर एक मोटरसायकल थेट ट्रकच्या खाली गेली. मोटरसायकलवरील एक युवक रस्त्यावर फेकला गेला तर दुसरा पाठीमागच्या दोन टायरमध्ये अडकला. गंभीर जखमी झालेला युवकाच्या अंगावर ट्रकच्या टायरचा काही भाग अडकला होता. अडकलेला युवक मोठ्याने ओरडत होता. या आवाजाने पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी गाडीतून उतरत स्वत:च तत्काळ वाहतूक थांबवली.

पोलिसांची गाडी बघून ट्रक चालक ट्रक तेथेच सोडून पळून गेला.वाहतूक रोखल्यानंतर ट्रकच्या टायरमध्ये अडकेल्या युवकाला काढण्याचे प्रयत्न सुरु केले.  त्यावेळी समीर शेख यांनी दुसऱ्या ट्रकला तत्काळ रस्त्यातच थांबवून अपघातग्रस्त ट्रक चालवण्यास सांगितले आणि अलगद ट्रक पुढे घेण्यास सांगितले.काही मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर जखमी युवकाची अडकलेल्या टायरातून सुटका केली.

stray dog attacks 6 people in ulhasnagar
भटक्या श्वानाचा ६ जणांवर हल्ला; उल्हासनगरातील घटना, भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
ahilyanagar police
अहिल्यानगर : पोलीस बळाचा वापर करत महापालिकेने अतिक्रमणे हटवली
Meet the citizens every Tuesday-Wednesday Commissioners circular
दर मंगळवार- बुधवारी नागरिकांना भेटा, आयुक्तांचे परिपत्रक
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
Nagpur imprisoners loksatta news
कैद्यांना कुटुंबियांची घेता येईल ‘ई-भेट’, वेळेची होणार बचत, त्रासही होईल कमी
road accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ठाणे, भिवंडी कोंडले
is the police protecting reckless drivers
बेदरकार वाहनचालकांना पोलिसांचे अभय?

हेही वाचा >>>“छगन भुजबळ पागल झालेल्या माणसासारखं…”, ‘त्या’ आरोपावरून मनोज जरांगेंचा संताप

रुग्णवाहिका नसल्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या एका मोकळ्या रुग्णवाहिकेला पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी थांबवून त्या दोन्ही जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हा पोलिस प्रमुखांनी दाखवलेल्या तत्परतेनं मात्र कमी वेळात दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु झाले आणि वाहतूकही सुरळीत सुरु झाली.आपल्या धडाकेबाज कार्यशैलींने  पोलीस अधीक्षकांचे साताऱ्यात नेहमीच अभिनंदन होत असते आज तर सातारकरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Story img Loader