वाई: पोलिस अधीक्षक समीर शेख कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिदिनाच्या कार्यक्रमांनंतर सातारला येत असताना त्यांच्या समोर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली गेली. क्षणभर वेळ न घालवता त्यांनी संबंधित दुचाकीस्वारांचा जीव वाचला आणि अपघातानंतर होणारी वाहतूक कोंडी सुद्धा टाळली.कराड येथील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रमानंतर महामार्गावरून सातारच्या दिशेने निघालेल्या जिल्हा पोलिस प्रमुखांसमोर एक मोटरसायकल थेट ट्रकच्या खाली गेली. मोटरसायकलवरील एक युवक रस्त्यावर फेकला गेला तर दुसरा पाठीमागच्या दोन टायरमध्ये अडकला. गंभीर जखमी झालेला युवकाच्या अंगावर ट्रकच्या टायरचा काही भाग अडकला होता. अडकलेला युवक मोठ्याने ओरडत होता. या आवाजाने पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी गाडीतून उतरत स्वत:च तत्काळ वाहतूक थांबवली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in