वाई: आंतरराज्य घरफोड्या करणाऱ्य के.टी.एम गॅंगला सातारा पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून तब्बल ७० लाख चार हजार ऐशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित होत्या.मार्च २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील सातारा तालुका, मेढा, बोरगाव,खंडाळा, शिरवळ, भुईंज, वाई, वाठार, उंब्रज, मल्हारपेठ, वडुज, कराड तालूका पोलीस ठाणे हद्दीत २७  बंद घरे  फोडून सोन्या, चांदीचे दागिणे व रोख रकमा चोरी केल्या होत्या.एकाच वेळी अनेक चोऱ्या करून हि टोळी वेगवान दुचाकी वरून गुजरात ला जात असत. त्यामुळे या टोळीचा कोणाला ठाव ठिकाणा लागत नव्हता.त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या टोळी बाबत पुणे पौंड यवत मुळशी येथे असल्याची माहिती मिळाल्यावर सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे,सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक,अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांना आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या.त्यांनी  सुरदेव सिलोन नानावत,(घोटावडे ता मुळशी), राम धारा बिरावत(करमोळी ता पौंड), परदुम सिलोन नानावत(घोटावडे ता मुळशी) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली .घरफोडया करुन सोन्या, चांदीचे दागिणे व रोख रकमा चोरी केल्या असल्याचे सांगून सदरची सोन्या चांदीचे दागिणे संपर्कातील  साथीदार वामन नंदू राठोड (रा. फंडवस्ती रांजनगाव जि. पुणे), व वाल्मीक रामभाऊ शेखावत, (रा. पाटस, ता.दौंड, जि. पुणे) यांच्या मदतीने अहमदाबाद राज्य गुजरात येथील एका महिला सोनार तसेच सोनपालसिंग नारायणसिंग रजपूत व प्रदिप आसनदास खटवानी यांना विकले असल्याचे सांगीतले.आरोपींनी दिलेल्या माहिती प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक तात्काळ अहमदाबाद राज्य गुजरात येथेरवाना झाले व तेथून महिला सोनार व प्रदिप आसनदास खटवानी यांना ताब्यात घेतले व दोघांनाही सदर दागिने गुजरात राज्यात जावून  ज्या सोनारांकडे गहाण ठेवले होते त्या सोनारांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेले सोन्या चांदीच्या दागिण्यांपैकी, चालू बाजारा भावाप्रमाणे ६३लाख ३०हजार ५८०किंमतीचे १०३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व तीन लाख ८८ हजार ५०० रुपये किंमतीचे ५ किलो वजनाचे चांदीचे दागीने  सातारा येथून परराज्यात गुजरात येथे जाऊन हस्तगत करण्याची विक्रमी कामगिरी केलेली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्व आरोपींना ताब्यात घेवून देखील घरफोडी चोरीमधील चोरीस गेलेलामुद्देमाल हस्तगत होत नसल्याने मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे समोर होते असेही पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले. आता या आरोपींना इतर जिल्ह्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी, असे एकुण ११५ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी ३३८ तोळे सोने (३ किलो ३८० ग्रॅम) असा एकूण दोन कोटी ६सहा लाख १८ हजार व ४ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे ६ किलो वजनाचे चांदीचे दगिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.